फोटो : H34659
नाशिक : राष्ट्रीय परिषदेस उपस्थित मान्यवर.
--
गोसावी औषधनिर्माणशास्त्र
महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद
नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटीचे सर डॉ. मो. स. गोसावी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ‘फार्मास्युटिकल संशोधनातील आधुनिक तंत्रज्ञान व नवोन्मेष’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद उत्साहात झाली.
उद्घाटनास डॉ. मिलिंद वाघ, डॉ. दीप्ती देशपांडे, डॉ. सुनील महाजन व प्राचार्य डॉ. सुनील अमृतकार उपस्थित होते. या वेळी रिसर्च पेपरच्या ॲबस्ट्रॅक्ट पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पहिल्या दिवशी डॉ. प्रणव जे. शाह आणि डॉ. योगेश्वर बच्छाव यांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या पोस्टर सादरीकरणाचे मूल्यमापन करून पारितोषिके देण्यात आली. दुसऱ्या दिवशी डॉ. हर्षद कोठावदे, डॉ. एल. साथियानारायणन आणि डॉ. अरुलमोझी एस. यांनी मार्गदर्शन केले. या परिषदेत एकूण ३७३ जणांनी सहभाग घेतला. डॉ. विपुलता येवले, डॉ. विशाल जाधव, डॉ. रावसाहेब घेगडे, डॉ. रमणलाल कचवे, डॉ. विजय लांबोळे यांनी सेशन चेअर म्हणून तर डॉ. नमिता जोशी, डॉ. भंडारी, श्री. संदीप पुरकर, डॉ. शिल्पा हरक, स्मिता शेळके यांनी समन्वय सांभाळला. डॉ. साहेबराव बोरस्ते, डॉ. दत्तात्रेय शिनकर व डॉ. प्रशांत पिंगळे यांनी संयोजन केले. संस्थेचे पदाधिकारी व मार्गदर्शक यांच्या सहकार्याने परिषद यशस्वी झाली