तौक्ते चक्रीवादळ व नैसर्गिक आपत्तीतील मृतांच्या वारसांना मदत; उत्तर महाराष्ट्रासाठी निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tauktae

तौक्ते चक्रीवादळ व नैसर्गिक आपत्तीतील मृतांच्या वारसांना मदत

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : तौक्ते चक्रीवादळ (tauktae cyclone) आणि इतर नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना राज्य सरकारने (state government) तातडीने दोन कोटी ९६ लाख ३३ हजारांची मदत मंजूर केली आहे. त्यात उत्तर महाराष्ट्रातील जळगावसाठीच्या १६ लाखांच्या निधीचा समावेश आहे.

उत्तर महाराष्ट्रात जळगावसाठी १६ लाखांचा निधी

कोकण विभागाला एक कोटी ३६ लाख २० हजार, पुणे विभागाला ४४ लाख १३ हजार, औरंगाबाद विभागाला एक कोटीची मदत देण्यात आली आहे. त्यात पुण्यासाठीच्या १६, सातारासाठी २०, सांगलीसाठी ८ लाख, तर सोलापूरसाठी १३ हजार रुपयांचा समावेश आहे. औरंगाबादला १२, जालन्यासाठी १६, परभणी आणि हिंगोलीसाठी प्रत्येकी १२, नांदेड व बीडसाठी प्रत्येकी १६, लातूर आणि उस्मानाबादसाठी प्रत्येकी आठ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही मदत वारसांना दिली जाणार आहे. राज्यात नैसर्गिक आपत्तीत बाधित व्यक्तींना मदत देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तपणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची स्थापना केली आहे. या निधीतून ही मदत देण्यात आली आहे.

हेही वाचा: येवल्यात सोमवारपासून कांदा लिलाव होणार सुरू

loading image
go to top