४ ---दिवाळी अंक ---तापी- नर्मदा खोऱ्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळे

४ ---दिवाळी अंक ---तापी- नर्मदा खोऱ्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळे
Published on: 
निसर्ग पर्यटन तापी- नर्मदा खोऱ्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळे फोटो : NSK26H32445 (अक्राणी किल्ला) फोटो : NSK26H32443 (अस्तंबा यात्रा) फोटो : NSK26H32444 (शहादा येथील जैनांचे लेणी मंदिर) फोटो : NSK26H32446 (तिनसमाळ डोंगर) फोटो : NSK26H32447 (रावलापाणी सत्याग्रह स्थळ) फोटो : NSK26H32442 (डॉ. कांतीलाल टाटीया) ----------------------- पर्यटकांना मोहिनी घालणारा नंदुरबार जिल्हा ----------------------------------- नर्मदेचे अथांग जलवैभव, सातपुड्याच्या पर्वतरांगा, प्राचीन तीर्थक्षेत्रे, ऐतिहासिक गढ्या आणि समृद्ध आदिवासी संस्कृती अशी पर्यटनाची अनोखी विविधता नंदुरबार जिल्ह्यात आहे. या संपत्तीचे नियोजनबद्ध संवर्धन करून जल, निसर्ग, धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटन विकसित केल्यास स्थानिक, विशेषतः शिक्षित आदिवासी तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. त्यासाठी लोकसहभागातून कालबद्ध पर्यटन विकास आराखडा राबविण्याची गरज आहे. - - डॉ. कांतीलाल टाटीया, शहादा जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार पाहता उत्तरेला नर्मदा नदी व तिच्यातील सरदार सरोवरचे बॅक वॉटर, त्याला लागून उभ्या असलेल्या सातपुड्याच्या उंचच उंच डोंगर रांगा, उत्तरेकडे विशाल नर्मदा खोरे व दक्षिणेकडे तापी खोरे आणि तापी नदी. त्या नदीतील विविध पाण्याने तुडुंब भरलेले बॅरेजेस व काठावरील धार्मिक स्थळे. पर्यटन स्थळांचा विचार करताना त्यांना वेगवेगळ्या गटात विभागणे आवश्यक आहे. जी प्राचीन व पुरातत्त्व विभागाशी जोडता येण्यासारखी स्थळे. ऐतिहासिक महत्व असणारी, सांस्कृतिक महत्त्व असणारी, निसर्ग जंगल डोंगर असलेले व कृषी विशेषतः व्यवसाय विशेष स्थळांना अधिकाधिक पर्यटक कसे आकर्षित होतील, याचा विचार करून जनतेच्या सहभागातून व व्यापारी दृष्टिकोनातून रोजगार निर्मितीचा विचार डोळ्यासमोर ठेवून आराखडा करण्याची गरज आहे. शहादा तालुक्यातील जैनांचे दोन हजार वर्षांपूर्वीची लेणी मंदिर, प्रकाशा, सारंगखेडा, जयनगर, शनिमांडळ या प्राचीन तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता असलेली स्थळांना धार्मिक महत्त्व आहे. प्रकाशा तर मध्ययुगीन काळातील व पुराणात उल्लेखलेले स्थळ आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात जिल्ह्यातील भूभागावर काठी नाला, रायसिंगपूर, सिंगपूर, सोजडान ही आदिवासी राजांची मेवाशी संस्थाने होती. अक्राणी व बुधावल ही राजपुतांची संस्थाने होती. अक्राणीचा किल्ला आज पडक्या अवस्थेत आहे. जिल्ह्यातील कोंढावळची गढी, हलदानीची गढी, फत्तेपुरची गढी यांचं पुनरुज्जीवन करून संशोधन केल्यास इतिहासातील सुवर्णकाळ अवगत होणार आहे. स्वातंत्र्यलढ्यात या जिल्ह्यातील आदिवासीनी भाग घेतल्याची साक्ष देणारा रावलापाणीचा संग्राम व नंदुरबारचा शिरीष कुमार या बाल शहिदाचा इतिहास जागर करण्यासाठी दोन्ही स्थळांचा विकास करणे अभिमानास्पद ठरणार आहे. पर्यटक आणि इतिहास संशोधकांसाठीसुद्धा ही स्थळे अभ्यास करण्यासाठी उपयोगी ठरणार आहेत. तोरणमाळ व दाब आणि अस्तंबा येथील यात्रोत्सव, त्यात भाविकांचा सहभाग या स्थळांना असलेले सांस्कृतिक महत्त्व समस्त आदिवासी समाजाच्या भावनेशी जोडलेली ही स्थळे आहेत. त्यांच्यातील सांस्कृतिक पवित्र टिकून आधुनिकता आणणे व भौतिक सोयी उपलब्ध करून दिल्यास तेथे येणाऱ्यांची संख्या सतत वाढणार आहे. अस्तंबा, हिराजा, शिंदाई घाट ही उंच डोंगरावरची स्थळे आहेत. तेथे गिर्यारोहणाचा आनंदही घेतला जाईल व धार्मिक पावित्र्याला धक्का पोहोचणार नाही, अशा दृष्टीने विकास करणे अगत्याचे आहे. नंदुरबार जिल्हा आदिवासीबहुल आहे म्हणून आदिवासींची सांस्कृतिक, धार्मिक मान्यताप्राप्त असलेल्या स्थळांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. दाबचे देवमोगरा मातेचे मंदिर, कोचरा मातेचे मंदिर, नवापूर तालुक्यातील देवमोगरा मातेचे मंदिर, गौयाचा तोडरदेव, नवागाव (पालखा) चा बारा गावांचा मान्यता असलेला देव, हीडिंबा देवी या सर्वांचा योग्य प्रकारे जीर्णोद्वार करून आदिवासी संस्कृती टिकविण्यासाठी उपयोगी ठरणार आहेत. काठी, डोमखेडी, शोभानगर येथील होलिकोत्सव, धडगाव, तोरणमाळ येथील भोंगोरिया बाजार, तळोदा - अक्कलकुवा तालुक्यातील होलीकोत्सवात होणारे दिंडल नृत्य, तोरणमाळ कडील पावानृत्य या स्थळांना विविध सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून व्यावसायिक रूप दिले पाहिजे. बिलगावचा आणि वाल्हेरीचा धबधबा, उनपदेवचा गरम पाण्याचा झरा, तोरणमाळचा सात पायरीचा घाट, चांदशैली घाट, मोलगीचा देवगोई घाट, पिंपळखुट्याचा गमन बामणी सिंदुरी घाट, तोरणमाळ ते शिंदीदिगर- साक्या - लेकडा - भाबरी - भादल - नर्मदा या रस्त्याच्या क्षेत्रात वनविभागाने अधिक परिश्रमाने वनश्री नटवणे, जंगल राखणे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या आजूबाजूला कठडे व सेल्फी पॉईंटची निर्मिती करून निसर्गप्रेमींना आकर्षित केल्यास छोट्या व्यावसायिकांना रोजगार मिळणार आहे. तोरणमाळ हे पर्यटन केंद्र विकसित करण्याची गरज आहे. आज फक्त शनिवार - रविवार गर्दी दिसते. येथील तोरणादेवी, खडकी पॉईंट, आमदरी पॉईंट, सनसेट पॉईंट, दिल्ली गेट, सनराइज पॉइंट, मच्छिंद्रनाथ गुफा यांच्यापर्यंत केवळ चांगला रस्ता करून भागणार नाही. सीताखाई येथील रोप- वे बरोबरच खाईत उतरण्यासाठी चांगली पायवाट करणे, पर्यटकांना आकर्षित करू शकते. तसेच तोरणमाळ येथे विशाल सांस्कृतिक भवन, पर्यटकांसाठी दररोज विविध आदिवासींचे सांस्कृतिक कार्यक्रमांची उपलब्धता आदिवासी बांधव जुन्या परंपरेनुसार घेत असलेल्या भोजनाची व्यवस्था केंद्र, आदिवासी जीवनाशी निगडित दागिने, कपडे विक्री केंद्र, सर्व भौतिक सुखसोयीनी युक्त निवास व्यवस्था उपलब्ध करणे आवश्यक आहे. सरदार सरोवरमुळे असलेल्या बॅकवॉटरच्या नर्मदा काठावरील गावांना दळण वळणाची सोय उपलब्ध करणे शक्य आहे. यासाठी भादल, भूषा ते केवडिया असा सरदार सरोवरमधील बॅक वॉटरमधून वोटिंगची सोय केल्यास व मार्गावरील उडद्या, भुषा, शेलदा, डोमखेडी, मुखडी, डनेल, बामणी, सिंदुरी, मणिबेली येथे थांबे व मुक्कामाची व्यवस्था निर्माण केल्यास या जलमार्गातील काठावरील तरुणांना नवा व्यवसाय उपलब्ध होणार आहे. याचप्रमाणे बोटिंग साठी सारंगखेडा ते प्रकाशा बॅरेजमध्ये असलेल्या पाण्यातून पर्यटन म्हणून व प्रकाशा ते सारंखेडा असा जलमार्ग म्हणून विकसित करून रोजगार उपलब्ध करून देता येईल. याशिवाय नव्याने नर्मदा काठावरील भूषा व पौला ही नवी पर्यटन केंद्रे तसेच धडगाव तालुक्यातील तिनसमाळ या गावाचा सुद्धा पर्यटन गाव म्हणून विकास करता येईल. येथे घाट रस्त्याने जाताना मनमुराद निसर्गाचा व ॲडव्हेन्चर म्हणून सुद्धा आनंद लुटता येईल. या ठिकाणी सायंकाळनंतर जंगली हिंस्त्र प्राण्याचा राबता आहे. नयनरम्य, निसर्गरम्य हे ठिकाण आहे. या ठिकाणी गुजरात, महाराष्ट्र व मध्य प्रदेश या तीनही प्रांतांच्या सीमा एकत्र असल्याचे दिसते. हे ठिकाण तोरणमाळपेक्षाही जास्त पर्यटक येतील असे आहे. अक्कलकुवा तालुक्यात कवडी डोंगर हे ठिकाण नर्मदेच्या काठावर उंच ठिकाणी आहे. गमन ते कवडी डोंगर या बारा किलोमीटर रस्त्यापैकी सहा किलोमीटरचा रस्ता नर्मदा नदीच्या उंच काठावरून जातो. नर्मदा नदी पाण्याने भरलेली असते. हे दृश्य पर्यटकांना मोहून टाकणारे असणार आहे. हेही ठिकाण विकसित करण्यासारखे आहे. धडगाव तालुक्यातील लेगा पाणी व अक्कलकुवा तालुक्यातील कंजाला हे गाव वनौषधी निर्मितीचे व सातपु ड्यातील गर्द झाडी असणारे ठिकाण असल्याने जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास हे सुद्धा पर्यटन केंद्र विकसित होऊ शकतात व स्थानिकांना रोजगार वाढवणारे ठरणार आहे. थोडक्यात जिल्ह्यातील प्राचीन, ऐतिहासिक महत्त्व असणारी, धार्मिक स्थळे व निसर्गाच्या सानिध्यातून निर्माण होणारी पर्यटन स्थळे व जल पर्यटन यांना डोळ्यासमोर ठेवून पर्यटन विकास आराखडा केल्यास व तो टाईमबाउंड पद्धतीने राबवल्यास जिल्ह्यात पर्यटन क्षेत्रात मोठी वाढ करता येईल व शिक्षित आदिवासी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. या लेखाला सकाळच्या शैलीनुसार आकर्षक शीर्षक व समर्पक एंट्रो करून द्यावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.