नाट्य परिषदेचे विविध पुरस्कार जाहीर
निलम शिर्के-सामंत यांच्या हस्ते गुरूवारी वितरण
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २ : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेतर्फे मराठी रंगभूमी दिनानिमित्त प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी सोमवारी (ता. २) पत्रकार परिषदेत केली. या वेळी प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, बालरंगभूमी परिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष महेश डोकफोडे, खजिनदार ईश्र्वर जगताप, सहकार्यवाह विजय शिंगणे उपस्थित होते. सदर पुरस्कारांचे वितरण गुरूवारी (ता. ५) महाकवी कालिदास कलामंदिरात सायंकाळी साडे पाचला बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा ॲड. निलम शिर्के-सामंत यांच्या हस्ते होईल. पुरस्कारांचे अकरावे वर्ष असून सुरवातीला ‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवात पहिल्या आलेल्या बालकलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल.
--
असे आहेत पुरस्कारर्थी
(पुरस्काराचे स्वरूप : दोन हजार रुपये व स्मृतीचिन्ह)
-दत्ता भट स्मृती पुरस्कार (अभिनय पुरुष) : एकनाथ सातपूरकर
-शांता जोग स्मृती पुरस्कार (अभिनय स्त्री) : वृषाली कुलकर्णी
-प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार (दिग्दर्शन) : राजेश जाधव
-नेताजी भोईर स्मृती पुरस्कार (लेखन) : देवेन कापडणीस
-रावसाहेब अंधारे स्मृती पुरस्कार (नेपथ्य) : राजेंद्र जाधव
चारुदत्त दीक्षित स्मृती पुरस्कार (संगीत) : अतुल गांगुर्डे
-बापूसाहेब काळसेकर स्मृती पुरस्कार (रंगभूषा) : ललित निकम
-पुरोहित स्मृती पुरस्कार (बालरंगभूमी) : पूनम पाटील
-जयंत वैशंपायन स्मृती पुरस्कार (सांस्कृतिक पत्रकारिता) : शैलेंद्र तनपुरे
-रामदास बरकले स्मृती पुरस्कार (लोककलावंत) : राजेश शर्मा
-शाहीर गजाभाऊ बेणी स्मृती पुरस्कार (शाहीर पुरस्कार) : प्रा. प्रवीण जाधव
-वामनदादा कर्डक स्मृती पुरस्कार (सामाजिक व सांस्कृतिक) : बाळासाहेब शिंदे
-------
-रंगतपस्या पुरस्कार : अभिनेते अक्षय मुडावतकर
(अकरा हजार रुपये व स्मृतीचिन्ह)
-------
-रंगनायिका पुरस्कार : मानसी मारू
-रंगनायक पुरस्कार : अमोल थोरात
-रंग दिग्दर्शन पुरस्कार : वरुण भोईर
(पंधरा हजार रुपये व स्मृतीचिन्ह)
-------
-सर्वोत्कृष्ट रंगसंघ पुरस्कार (प्रथम) : विजय नाट्य मंडळ
-सर्वोत्कृष्ट रंगसंघ पुरस्कार (द्वितीय) : परिवर्तन बहुद्देशीय संस्था
(दहा हजार रुपये व स्मृतीचिन्ह)
-------
विशेष योगदान पुरस्कार : लक्ष्मण सावजी (सामाजिक), सचिन जोशी (शैक्षणिक), पल्लवी कदम (सांस्कृतिक), मनोहर नेटावणे (दिव्यांग लोककलावंत), श्रीया तोरणे (चित्रपट)
-----------