SNR26B23164
सिन्नर ः शिवाई बहुउद्देशीय संस्थेच्या नवदुर्गा पुरस्कारप्राप्त महिलांसह प्रणिता श्रीनिवार, डॉ. निर्मला गायकवाड, रावसाहेब आढाव आदी.
--------------
३०-२
सिन्नरला शिवाई संस्थेतर्फे
नवदुर्गा पुरस्कारांचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता.१९ ः शिवाई बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे नवदुर्गा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात झाला. लोकनेते शंकरराव बाळाजी बाजे विद्यालयाच्या माजी विद्यार्थी सभागृहात हा सोहळा झाला.
धर्मादाय उपआयुक्त प्रणिता श्रीनिवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. निर्मला गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सोहळ्यास नामदेव लोणारे, गोविंद लोखंडे, राम ढोली, शुभम वारुंगसे, नितीन शिंदे, जयंत घुमरे, प्रविण कोकाटे, यतीन भाबड, संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब आढाव, उपाध्यक्ष डॉ. भूषण वाघ, सरचिटणीस सचिन कोकाटे, पदाधिकारी साहेबराव सांगळे, भाऊसाहेब आढाव, रमेश राठोड, राजेंद्र पगार, दादासाहेब जोंधळे, बाळासाहेब वाघ, भारती आढाव, रोहिणी परदेशी, संकेत आढाव आदी उपस्थित होते
कमळाबाई पगार (सामाजिक क्षेत्र), शीतल घुमरे (शेती क्षेत्र), सुनीता लोखंडे (शैक्षणिक), डॉ. अश्विनी देवरे (उद्योग क्षेत्र), साधना भाबड (सहकार), सुचित्रा गांगुर्डे (प्रशासकीय), निलीमा बलक (बालसंगोपन), रंजना आव्हाड (महिला सबलीकरण), प्रियका घोडके (क्रीडा क्षेत्र) यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
अध्यक्ष आढाव यांनी शिवाई संस्थेच्या उपक्रमाबाबत सांगताना संस्थेने सहा मुले शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेतलेली आहेत. दरवर्षी सर्वरोग निदान, रक्तदान शिबिर घेतली जात आहेत. रुग्णासाठी वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली. दीपक भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. रोहिणी परदेशी यांनी आभार मानले.
-----------------