नवदुर्गा दर्शनवारीत १८० किलोमीटरचा प्रवास पूर्ण सिन्नर सायकलिस्टरच्या उपक्रमाला प्रतिसाद

नवदुर्गा दर्शनवारीत १८० किलोमीटरचा प्रवास पूर्ण  सिन्नर सायकलिस्टरच्या उपक्रमाला प्रतिसाद
Published on: 
--------------- सिंगल SNR26B23162 सिन्नर ः नवदुर्गा चँलेंजमध्ये सहभागी झालेले सायकलिस्ट. ---------- ३६-२ सिन्नर सायकलिस्टची नवदुर्गा दर्शनवारी पूर्ण ------------------ एकाच दिवसात १८० किमी प्रवास ----------- सिन्नर, ता.१९ ः सिन्नर सायकलिस्टच्या ‘नवदुर्गा चॅलेंज’ अंतर्गत आयोजित सिन्नर ते चांदवड श्री रेणुका माता दर्शनवारी उत्साहात झाली. सायकलवारीत भक्ती, जिद्द, सहकार्य आणि सायकलिंगचा अनोखा संगम पाहायला मिळाला. या वारीत रायडर्सनी एकाच दिवसात सहा देवींचे दर्शन घेत सुमारे १८० किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण केला. ---------------- भगूर येथील रेणुका माता मंदिराच्या दर्शनाने सुरुवात झाली. नाशिक रोड येथील दुर्गामातेचे दर्शन घेऊन सायकलस्वार चांदवडच्या दिशेने रवाना झाले. वंदना सोनवणे यांनी दाखवलेली जिद्द विशेष लक्षवेधी ठरली. नऊ दिवसांचे उपवास सुरू असतानाही आणि अनवाणी पायांनी सायकल चालवत १८० किलोमीटरची सायकलवारी पूर्ण केली. चांदवड- लासलगाव- विंचूर- नांदूरमध्यमेश्वरमार्गे सिन्नरकडे हा परतीचा प्रवास होता. कामाख्या देवी, म्हाळसकोरे येथील म्हाळसादेवी आणि खिंडीतील आई तुळजाभवानीचे दर्शन घेण्यात आले. सायकलिस्टचे माजी अध्यक्ष नितीन जाधव, नीलेश सोनवणे, वंदना सोनवणे, मुकेश चव्हाणके, शरद भन्साळी, संतोष कदम, शैलेश पद्मसाळी यांनी सहभाग नोंदवला. आरोग्य, फिटनेस, धार्मिक पर्यटन आणि सायकलिंग संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा संदेश देण्यात आला. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com