Nashik Navchetana Abhiyan
sakal
किरण कवडे- नाशिक: एकल महिलांच्या आयुष्याला जोडलेल्या अनिष्ट प्रथा, रुढी आणि परंपरा यांना छेद देण्यासाठी जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या ‘नवचेतना अभियानां’तर्गत झालेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात एकूण ९४ हजार ९८५ एकल महिला असल्याचे आकडे समोर आले आहेत. सिन्नर, इगतपुरी, येवला आणि निफाड या चार तालुक्यांत सर्वाधिक महिला असून, शासकीय योजनांच्या माध्यमातून त्यांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्याचे प्रयत्न सुरू झाले.