नऊ रंगांतून सामाजिक परिवर्तनाचा जागर

नऊ रंगांतून सामाजिक परिवर्तनाचा जागर
Published on: 
नऊ रंगांतून सामाजिक परिवर्तनाचा जागर प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेचा ‘नवदुर्गा २०२६’ उपक्रम सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २४ : नवरात्रातील नऊ रंगांना समाजकार्याच्या नऊ शक्तींची जोड देत प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ‘नवदुर्गा २०२६’ हा अभिनव उपक्रम नुकताच राबविण्यात आला. ‘नऊ रंग, नऊ भूमिका, नऊ शक्ती आणि एकच ध्येय-सामाजिक परिवर्तन’ या संकल्पनेतून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा संदेश देण्यात आला. उपक्रमात नेतृत्व, मानवता, युवक सक्षमीकरण, सामाजिक न्याय, शिक्षण, कौशल्यविकास, समुदाय विकास, संघर्षातून उभे राहण्याची जिद्द आणि वंचितांचा आवाज अशा विविध विषयांवर जनजागृती करण्यात आली. शिक्षण व कौशल्यविकासातून स्वावलंबन साधत युवकांना करिअर मार्गदर्शन आणि रोजगाराच्या संधींशी जोडण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. महिला सक्षमीकरण हा उपक्रमाचा प्रमुख केंद्रबिंदू ठरला. महिलांना कौशल्यविकास, रोजगार, आर्थिक स्वावलंबन आणि नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा संदेश देण्यात आला. ‘एक सक्षम महिला, एक सक्षम कुटुंब आणि एक सक्षम समाज घडवते’ हा विचार प्रभावीपणे मांडण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुनील पाटील यांनी उपक्रमाचे कौतुक करून सहभागींचे अभिनंदन केले. प्रकल्प प्रमुख विजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाचे संकल्पनात्मक सादरीकरण करण्यात आले. ‘नऊ दिशा… एकच ध्येय-सामाजिक परिवर्तन!’ या सामूहिक संदेशाने उपक्रमाची सांगता झाली. समाजकार्याच्या माध्यमातून व्यक्ती, कुटुंब आणि समुदाय सक्षम करण्याचा निर्धार यावेळी अधोरेखित झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com