रातिर विद्यार्थी मेळावा

रातिर विद्यार्थी मेळावा
Published on: 
10210 नवेरातीर (ता. बागलाण) : माजी विद्यार्थी मेळाव्यास उपस्थित मान्यवर. नवे रातीर शाळेत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात सकाळ वृत्तसेवा नामपूर, ता. १४ : शाळेने दिलेले शिक्षण, संस्कार आणि जीवनाला मिळालेली दिशा यांची जाणीव ठेवत माजी विद्यार्थ्यांनी नवे रातीर (ता. बागलाण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येण्याचा निर्धार केला. नुकत्याच झालेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यात शाळेचा शैक्षणिक व भौतिक विकास करण्यासह विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी सहकार्य करण्याचा संकल्प करण्यात आला. अध्यक्षस्थानी सजन आहिरे होते. यावेळी केवळ आहिरे, सरपंच विमल आहिरे, मुख्याध्यापक रविंद्र पाटील यांच्यासह गावातील माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अविनाश खैरनार यांनी केले. प्रास्ताविक पांडुरंग पाटील यांनी केले. बदलत्या शैक्षणिक प्रवाहानुसार विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळावे, यासाठी शाळेत रोबोटिक्स व कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रयोगशाळा उभारण्याचा मानस शिक्षकांनी व्यक्त केला. मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देत शिक्षकांविषयी कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या. शाळेने दिलेले शिक्षण आणि संस्कार यांची परतफेड करण्याच्या भावनेतून शाळेच्या विकासासाठी आर्थिक सहकार्य तसेच आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन माजी विद्यार्थ्यांनी दिले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अशोक बच्छाव, हेमंत निकम, सुजितकुमार देसले, जगदीश खैरनार, सोनालिका पवार, श्रीमती देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले. श्री. ठोके यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.