Water Supplysakal
नाशिक
Nashik News : नवीन नाशिकमध्ये पाण्यासाठी वणवण; कमी दाबाने पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त, आंदोलनाचा इशारा
Persistent Low-Pressure Water Supply in Nashik Sidhco : नवीन नाशिकमधील सिडको परिसरातील रहिवाशांना अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने आणि ड्रेनेज मिश्रित गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे
नवीन नाशिक- सिडकोतील माउली लॉन्सच्या मागील बाजूस असलेल्या माउली रो-हाऊस, वैष्णवी रो-हाउस, आशिष रो-हाउस, धर्मात्मा सोसायटी आणि साईबाबा रो हाउसेस येथील रहिवाशांना अनेक दिवसांपासून अल्प दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नागरिक मोठ्या त्रासातून जात आहेत. रोज होणारा पाण्याचा पुरवठा कमी दाबाने होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. मात्र पाणीपुरवठा इतक्या कमी दाबाने असतो, की घरातील टाक्यांमध्ये पाणीच पोचत नाही.