esakal | आदिमायेचा सप्तजयघोष… सप्तमीनिमित्त सप्तश्रृंगीगडावर भाविकांची गर्दी | Nashik
sakal

बोलून बातमी शोधा

Saptashrungi Devi

आदिमायेचा सप्तजयघोष… सप्तमीनिमित्त सप्तश्रृंगीगडावर भाविकांची गर्दी

sakal_logo
By
दिगंबर पाटोळे

वणी (जि. नाशिक) : 'सप्तशृंगी माता की जय', "अंबे माते की जय' चा जयघोष डफ ताशाच्या निनादात सप्तश्रृंगीगडावर सप्तमीनिमित्त आदिमायेचा जागर करीत २५ हजारावर भाविक देवीचरणी नतमस्तक झाले.

गुजरातसह राज्यभरातून हजारो भाविक पंरपरेने दरवर्षी प्रमाणे आजही गडावर येवून सप्तमीनिमित्त दर्शन घेतले. यात पदयात्रेने आलेले भाविकही मोठ्या संख्येने होते. सप्तमीनिमित्त सकाळी सातला देवीच्या अलंकाराची न्यासाच्या कार्यालयात विधीवत पूजन करण्यात आले. यानंतर पारंपरिक वाद्यांच्यागजरात दागिन्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. श्री भगवतीची पंचामृत महापूजा विश्वस्त डॉ. प्रशांत देवरे यांनी सपत्नीक केली.

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही श्री भागवतीची काकड आरती करून देवीचे दर्शन घेतल्याची माहिती न्यासाचे जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे यांनी दिली. दरम्यान देवीस आज भरजरी हिरवा शालू नेसवून सोन्याचे मुकुट, मंगळसूत्र, वज्रटीक, कमरपट्टा, पाऊल, कर्णफुले, पुतळीहार, तोडे असे आभुषणे चढवून तर गळ्यात लिंबू हार, नागिनीचे पान हार, कवड्यांचा हार घालून आकर्षक फुलांची आरास करुन पूजा घालण्यात आली होती. सप्तमीनिमित्त भक्तांगण तसेच देवी सभामंडप व परिसरात दिवसभरात शेकडो महिला भाविकांनी सप्तशतीचे पारायण केले. दरम्यान नवरात्रोत्सवातील होम हवन, सप्तशती पारायणाबरोबरच ठिकठिकाणी चक्रपू झाली. चक्रपूजेसाठी गडावर पुरेशी जागा नसल्याने तसेच गडावर आवश्यक कार्यक्रम, प्रसादाचे साहित्य बहुतांश भाविक जाऊ शकले नसल्याने नांदुरी येथेच गडाच्या पायथ्याशी मिळेल त्या जागेत कसमा तसेच खांदेशातून आलॆल्या भाविकांनी चक्रपूजा घातली. नवरात्रोतेसवातील पुढील तीनही दिवस धार्मिक दृष्या महत्वाचे असल्याने भाविकांनी वीस हजाराच्या आसपास ऑनलाईन पास नोंदणी करुन ठेवले आहे. प्रशासन ऑनलाईन पास नसलेल्यांनाही आरोग्य तपासणी करीत सोडत असल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.

हेही वाचा: पुनूमियाची सिन्नरमध्ये जमीन; परमबीर सिंग यांच्याशी संबंध असल्याची चर्चा

कालरात्री देवीचा महिमा

नवरात्रीच्या सातव्या दिवशी माता कालरात्री देवीची पूजा केली जाते. नवदुर्गामध्ये माता कालरात्री देवी ही सातवी दुर्गा मानली जाते. कालरात्री देवीच्या शरीराचा रंग अंधाऱ्या रात्रीप्रमाणे काळा, डोक्यावरील केस विखुरलेले आणि गळ्यात चमकणारी माळ आहे. म्हणून या देवीला कालरात्री म्हणतात. या देवीच्या श्वासातून अग्नीच्या ज्वाळा निघतात. देवीच्या उजव्या हाताची अभय व दुसऱ्या हाताची वरमुद्रा आहे. डाव्या हातात लोखंडाचा काटा व दुसऱ्या हातात तलवार आहे. उग्र स्वरूप असूनही शुभ फळ देणाऱ्या या देवीला शुभंकरी म्हणतात. सप्तमी तिथीला कालरात्री देवीला पूजा केल्याने शनीचे अशुभ प्रभाव टळतात आणि सर्व सिद्धी प्राप्त होते असे म्हटले जाते.

हेही वाचा: भीती गेली, शाळा भरली; जिल्ह्यात सव्वादोन लाख विद्यार्थी वर्गात

loading image
go to top