दहा दिवसांचा नवरात्रोत्सव; अष्टमी-नवमी एकाच दिवशी

दहा दिवसांचा नवरात्रोत्सव; अष्टमी-नवमी एकाच दिवशी
Published on: 
एन्कर -- फोटो : देवी मुख दहा दिवसांचा नवरात्रोत्सव; अष्टमी-नवमी एकाच दिवशी चित्रा नक्षत्र-वैधृति योगातील घटस्थापना ; सप्तमी व्यापणार दोन दिवस सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ५ : शक्तीची उपासना, साधना आणि जागराचा उत्सव असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाला यंदा पंचांगातील काही वैशिष्ट्यपूर्ण तिथी- संयोगामुळे वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. ११ ऑक्टोबरला घटस्थापनेने नवरात्राला प्रारंभ होणार असून १९ ऑक्टोबरला अष्टमी आणि नवमीचे पूजन एकाच दिवशी होणार आहे. त्यानंतर २० ऑक्टोबरला विजयादशमी साजरी होईल. त्यामुळे यंदाच्या नवरात्रात तिथींच्या क्रमात विशेष बदल जाणवणार आहे. नवरात्राची प्रतिपदा तिथी १० ऑक्टोबरच्या रात्री ९.१९ वाजता सुरू होऊन ११ ऑक्टोबरच्या रात्री ९.३० वाजता संपणार आहे. त्यामुळे घटस्थापना ११ ऑक्टोबरलाच केली जाणार आहे. घटस्थापनेसाठी सकाळचा मुहूर्त सुमारे ६.३१ ते १०.२७ असा दिला आहे; अभिजित मुहूर्तही उपलब्ध आहे. यंदाच्या नवरात्रात सप्तमी तिथी दोन दिवस व्यापणार असून १७ व १८ ऑक्टोबरला सप्तमीचे आचरण आहे. १९ ऑक्टोबरला अष्टमी आणि नवमी एकत्र येणार आहेत. या दिवशी दुर्गाष्टमीची पूजा, संधीपूजा, महागौरी-सिद्धिदात्री आराधना, हवन, कन्यापूजन आदी धार्मिक विधींना विशेष महत्त्व राहणार आहे. धार्मिक पंचांगपरंपरेनुसार यंदा देवीचे आगमन हत्तीवरून होत जाते. हत्तीला समृद्धी, स्थैर्य आणि भरभराटीचे प्रतीक मानले जाते. नवरात्रात घटस्थापनेपासून अखंड दीप, दुर्गासप्तशती किंवा देवीभागवताचे पठण, देवीस्तोत्र, नामस्मरण, उपवास, जप, होमहवन आणि जागरण अशा साधना केल्या जातात. शक्तीच्या विविध रूपांची उपासना करताना प्रतिपदेचा संकल्प, सप्तमीची विशेष आराधना, अष्टमीची दुर्गापूजा आणि नवमीचे हवन-कन्यापूजन यांना विशेष स्थान आहे. ---चौकट सप्तशृंग गडावर विशेष तयारी नाशिक जिल्ह्यासाठी नवरात्र उत्सवाला स्वतंत्र धार्मिक अधिष्ठान आहे. सप्तशृंगगडावरील श्री सप्तशृंगी देवीच्या नवरात्रोत्सवामुळे जिल्ह्यातील शक्तीआराधनेला विशेष महत्त्व प्राप्त होते. यंदा ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान गडावर नवरात्रोत्सव होणार असून भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने वाहतूक व भाविकांच्या सुविधांचे नियोजन केले आहे. --- महत्त्वाच्या तारखा ११ ऑक्टोबर- घटस्थापना, नवरात्र प्रारंभ १६ ऑक्टोबर - षष्ठी, सरस्वती आवाहन १७-१८ ऑक्टोबर - सप्तमी तिथीचा विस्तार १९ ऑक्टोबर - दुर्गाष्टमी व महानवमी, संधीपूजेला विशेष महत्त्व २० ऑक्टोबर -विजयादशमी, दसरा ---कोट यंदाच्या घटस्थापनेचा आणखी एक अभ्यासपूर्ण पैलू म्हणजे चित्रा नक्षत्र आणि वैधृती योग यांचा संयोग होत आहे. पंचांगशास्त्रात घटस्थापनेसाठी चित्रा नक्षत्र व वैधृती योग टाळण्याची परंपरा सांगितली जाते; मात्र ते पूर्णतः निषिद्ध नाही. परंपरेनुसार योग्य मुहूर्त निश्चित करून घटस्थापना करावी. -अमोल किरपेकर गुरूजी, वेदाचार्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com