मनुदेवी, पाटणादेवीसाठी दर १५ मिनिटांनी बस

मनुदेवी, पाटणादेवीसाठी दर १५ मिनिटांनी बस
Published on: 
टुडे एक ॲंकर एसटी बसचा फोटो वापरावा ॲंकर मनुदेवी, पाटणादेवीसाठी दर अर्धाताला बस ‘वणी’साठी प्रत्येक आगारातून जादा गाड्या; माहूरगड, तुळजापूरसाठीही सेवा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १३ : शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाल्याने आदिशक्तीच्या दर्शनासाठी भाविकांची विविध देवी मंदिरांकडे लगबग सुरू झाली आहे. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागाने जादा बसगाड्यांचे नियोजन केले आहे. यावल आणि चाळीसगाव बसस्थानकांतून मनुदेवी व पाटणादेवी मंदिरांसाठी दर अर्धातासाला बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच नाशिकजवळील वणी गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी जिल्ह्यातील प्रत्येक आगारातून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. माहूरगड, तुळजापूर आणि बिजासणी माता मंदिरासाठीही बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील देवी मंदिरांमध्ये दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढते. हे लक्षात घेऊन जळगाव एसटी विभागाने विविध मार्गांवर जादा बसगाड्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मनुदेवी आणि पाटणादेवी मंदिरांकडे जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून, गर्दीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक नियंत्रक आणि तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. वणी गडासाठी जादा गाड्या नाशिक जिल्ह्यातील वणी गडावरील सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी जळगाव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक जातात. यंदाही जिल्ह्यातील ११ आगारांतून प्रत्येकी दोन ते तीन जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी जाणे अधिक सुलभ होणार आहे. मनुदेवीसाठी विशेष व्यवस्था यावल तालुक्यातील मनुदेवी मंदिरासाठी चोपडा, जळगाव आणि भुसावळ आगारांतून प्रत्येकी चार ते पाच जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. यावल बसस्थानकातून मनुदेवीसाठी, तर चाळीसगाव बसस्थानकातून पाटणादेवीसाठी दररोज १५ ते २० जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. सवलतीत बस महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या प्रवासभाड्यात नियमानुसार सवलत मिळते. तसेच एकाच ठिकाणी जाणाऱ्या ४४ प्रवाशांचा गट असल्यास सवलतीच्या योजनेत बस आरक्षित करता येणार आहे. माहूरगड, तुळजापूरसाठी नियमित सेवा नवरात्रोत्सवानिमित्त माहूरगड आणि तुळजापूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी जळगाव विभागातील तीन ते चार बसस्थानकांतून नियमित बससेवा उपलब्ध आहे. अमळनेर आगारातून बिजासणी माता मंदिरासाठीही बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तीन माळेला जादा फेऱ्या जिल्ह्यातील भाविकांचा ओढ सातव्या, आठव्या व नवव्या माळेला देवीच्या दर्शनासाठी गर्दी होते. त्यानुसार एसटी महामंडळाने मनुदेवी, पाटणादेवी तसेच वणी गडावर जाणार्याऱ्या प्रवाशांचा गर्दीचा ओघ पाहून बस फेर्यांमध्ये वाढ केली जाणार आहे. कोट.. नवरात्रोत्सवात जळगाव एसटी विभागाकडून जिल्ह्याताल तसेच जिल्ह्याबाहेरील आदीशक्तीच्या ठिकाणांसाठी जादा बसेसेचे नियोजन केले आहे. तसेच ज्या मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढेल त्या मार्गावर अधिक फेऱ्यांची वाढ केली जाईल. - मयूर पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी, जळगाव एसटी.
Marathi News Esakal
www.esakal.com