धुळे : टुडे पान २ साठी..अँकर.. शिल्लक बातमी
--
फोटो क्रमांक : 33172
दोंडाईचा : हस्ती वर्ल्ड स्कूलमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त झालेल्या दांडिया स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित विद्यार्थी. शेजारी शिक्षक, मान्यवर.
--
हस्ती स्कूलमध्ये नवरात्रोत्सवात विविध उपक्रम
--
नऊ दिवस स्त्रीशक्तीचा जागर; दांडिया स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २२ : दोंडाईचास्थित हस्ती चॅरितेबल ट्रस्ट संचलित हस्ती वर्ल्ड स्कूल दाऊळ शिवार येथे नवरात्रोत्सवानिमित्त सांस्कृतिक व मनोरंजनात्मक उपक्रम तसेच दांडिया स्पर्धा उत्साहात झाल्या. हस्ती ग्रुप ऑफ स्कूलचे अध्यक्ष कैलास जैन यांच्या मार्गदर्शनात नऊ दिवस भारतीय संस्कृती, परंपरा आणि स्त्रीशक्तीचा जागर करणाऱ्या विविध उपक्रमांनी परिसर उजळून निघाला.
प्रमुख अतिथी विक्की बाटुंगे, सारिका अग्रवाल, स्कूलचे हेड बॉय व हेड गर्ल यांच्या हस्ते माता सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने सुरुवात झाली. प्राचार्य जीवन सपकाळे, समन्वयिका समिना बोहरी यांच्यासह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक मूल्ये रुजावीत, परस्परांबद्दल आदर निर्माण व्हावा, सामूहिक सहभागाची भावना वाढीस लागावी या उद्देशाने हे उपक्रम राबवण्यात आले. नवरात्रोत्सवानिमित्त झालेल्या दांडिया स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तिसरी ते पाचवी मुलींच्या गटात अनुश्री वर्मा प्रथम, रूहानी माखीजा द्वितीय तर हर्शिदा जाधव तृतीय ठरली. याच गटातील मुलांमध्ये शौर्य चौधरी प्रथम, रामराख्या द्वितीय आणि पार्थ वाडिले तृतीय आला. सहावी ते दहावीच्या मुलींच्या गटात नित्या गोसावी प्रथम, युगांतरी द्वितीय व संस्कृती नागरे तृतीय आली. मुलांच्या गटात आर्यन मनचंदानी प्रथम, शौर्य घरटे द्वितीय तर हर्ष ठाकरे तृतीय आला. शिक्षकांच्या स्पर्धेत रिटा पाटील, विशाल बच्छाव व अजय पदमार यांनी यश मिळवले.
या वेळी शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या नऊ देवींचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व चलचित्रफितीद्वारे मांडण्यात आले. समन्वयिका समिना बोहरी, रिटा पाटील, सुचिता पवार, अनु जाधव, कविता पावरा, वैशाली महाजन, मोनाली मिस्तरी, दिपाली बोरसे, वर्षा अग्रवाल आणि सारिका पाटील यांनी माहिती दिली. विशाल पवार, प्रमोद कोळी व मनोज बिरारी यांनी सहकार्य केले.