धुळे ः टुडे २ साठी
--
फोटो क्रमांक ः 31512 ...लोकेश सूर्यवंशी
फोटो क्रमांक ः 31513 ....विपीन बडगुजर
--
फोटो क्रमांक ः 31514
धुळे : पांझरा नदीकिनारी श्री चामुंडामाता मंदिरात नवरात्रोत्सवामुळे झालेल्या बैठकीत सदस्यांशी संवाद साधताना ट्रस्टचे अध्यक्ष पंढरीनाथ बडगुजर.
--
सूर्यवंशी, बडगुजर यांची एकमताने निवड
-
श्री चामुंडामाता धर्मादाय ट्रस्ट धुळेतर्फे नवरात्रोत्सव समिती स्थापन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ६ : देवपूरमधील हत्ती डोह परिसरात पांझरा नदीकिनारी असलेल्या श्री चामुंडामाता मंदिरात यंदाचा नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. श्री चामुंडामाता धर्मादाय ट्रस्टतर्फे नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यासाठी नवरात्रोत्सव समिती २०२६ ची स्थापना करण्यात आली असून, अध्यक्षपदी लोकेश सूर्यवंशी आणि स्वागत समितीच्या अध्यक्षपदी विपीन बडगुजर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
ट्रस्टतर्फे श्री चामुंडामाता मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी व नियोजनासाठी बैठक झाली. ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ बडगुजर, मनोहर बडगुजर, प्रा. एच. आर. बडगुजर, संजीव बडगुजर, ॲड. सुरेश बडगुजर, अभियंता प्रदीप चव्हाण, मल्ल सचिन बडगुजर, लक्ष्मण बडगुजर, निखिल सूर्यवंशी, प्रा. प्रशांत बडगुजर, भूपेश बडगुजर, श्याम बडगुजर, माधुरी बडगुजर, अनिता बडगुजर, कोमल बडगुजर, निता बडगुजर, छाया बडगुजर, कल्पना बडगुजर, मनीषा बडगुजर, वंदना बडगुजर, कुसुम बडगुजर आदी उपस्थित होते. नवरात्रोत्सवानिमित्त पांझरा नदीकिनारी असलेल्या श्री चामुंडामाता मंदिरात जय्यत तयारी सुरू असून, मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई, तसेच भाविकांच्या स्वागतासाठी विविध व्यवस्था करण्यात येत आहे. भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष बडगुजर यांनी केले.
-
१४-१
धुळ्यात ज्योत आणणार
नवरात्रोत्सवानिमित्त गुजरातमधील चोटीला येथील श्री चामुंडामाता मंदिरातून ज्योत प्रज्वलित करून धुळ्यात आणण्यात येणार आहे. पहिल्या माळेला, रविवारी (ता. ११) सकाळी धुळे शहरातील शिवतीर्थाजवळ या ज्योतीचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर सुभाष पुतळ्यापासून श्री चामुंडामाता मंदिरापर्यंत ज्योतीची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या ज्योतीचे पूजन आमदार अनुप अग्रवाल, माजी केंद्रीयमंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, जयश्रीताई अहिरराव आदींच्या उपस्थितीत होणार आहे.
-