धुळे : टुडे पान २ साठी..
--
फोटो क्रमांक : 32901 ( फोटो शक्य झाल्यास तीन कॉलम घेणे.)
धुळे : भुजल कॉलनीतील निरामय योगा सेंटर येथे नवरात्रीनिमित्त झालेल्या दांडिया रास व गरबा उत्सवात सहभागी योगशिक्षिका नीता मोरे यांच्यासह उपस्थित योगसाधिका.
--
निरामय योग वर्गात गरबा रंगला
--
योगसाधनेबरोबरच जपली सांस्कृतिक परंपरा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १८ : देवपूर येथील भुजल कॉलनीतील निरामय योगा सेंटर येथे शनिवारी (ता. १७) नवरात्रीनिमित्त दांडिया रास व गरबा उत्सवाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी निरामय योग वर्गाच्या संचालिका व योगशिक्षिका नीता रमेश मोरे यांनी स्वतः उपस्थित राहून आपल्या योगसाधिकांसोबत दांडिया- गरबा खेळण्याचा आनंद घेतला. योगसाधनेबरोबरच सांस्कृतिक परंपरेची जोपासना करणाऱ्या या सोहळ्यामुळे सर्व साधिकांमध्ये मोठा उत्साह पाहावयास मिळाला.
या सोहळ्यात शोभा गजमल पाटील, आशा सोवे, शोभा देसले, शोभा भावसार, लता मोरे, स्वाती मोरे, विद्या मोरे, सुनंदा पारखे, सुनंदा सूर्यवंशी, गुंजन कुमारी, अश्विनी सोनावणे, वैष्णवी, कांचन थोरात, संगीता थोरात, सुरेखा थोरात, ममता फुलपगारे, पूजा गिरासे, सुरेखा पाटील, भूमिका पाटील, प्रिया ठाकरे, हिरकणी ठाकरे, अश्विनी कुलकर्णी, ज्योती मस्के, हेमलता बत्तीसे, जयश्री बत्तीसे, अनिता भदाणे, कल्पना काळे, सरोज बिऱ्हाडे, सरोज भावसार व दीपाली मेटकर या सर्व योगसाधिका उपस्थित होत्या. आरोग्य आणि संस्कृतीचा हा अनोखा संगम सर्वांसाठी कौतुकाचा ठरला.