Navratri Festival 2023: नांदगावला एकवीरा देवीच्या शारदोत्सवाला प्रारंभ! भाविकांची दर्शनासाठी गर्दी

Crowds for darshan of Ekvira Devi in ​​Gabhara
Crowds for darshan of Ekvira Devi in ​​Gabharaesakal
Updated on

Navratri Festival 2023 : शहराचे श्रद्धास्थान व आराध्य ग्रामदेवता असलेल्या श्री एकवीरा देवीच्या शारदात्सोवाला आज आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून प्रारंभ झाला. भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली. (Navratri Festival 2023 Sharadotsav of Ekvira Devi begins in Nandgaon Devotees flock for darshan nashik)

यानिमित्ताने सलग नऊ दिवसासाठी एकवीरादेवी मंदिरात विविध धार्मिक उपक्रम संपन्न होत असतात. या उत्सवकाळात देवीचे मंदिर दररोज पहाटे पाच उघडते. साडेपाचला त्यानंतर दुपारी साडेबाराला माध्यान्ह आरती होऊन देवीला नैवेद्य दिला जातो.

रात्री साडेआठला महाआरती व महाप्रसाद वाटप होतो. यंदाही मंदिराच्या प्रांगणात भाविक महिलांकडून परंपरेप्रमाणे घटस्थापना करण्यात आली असून, या नवरात्रोत्सवात देवीच्या मूर्तीला नऊ दिवसांत नऊ पैठण्या नेसविल्या जातात.

कुंकू मळवट व साजशृंगाराने देवीच्या मूर्तीला सजविले जाते. अष्टमीला सकाळी अकरापासून दुपारी चारपर्यंत हवन व देवी याग केला जातो. विजयादशमीला नऊ दिवसांचे पारायण होते.

आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या पन्नास लाख रुपयाच्या तीर्थक्षेत्र विकास योजनेतून ग्रामदेवता एकवीरा देवीच्या मंदिर परिसराचा मोठ्या प्रमाणात कायापालट करण्यात आला आहे.

मंदिर परिसराचे सुशोभीकरणाच्या कामामुळे नव्याने तयार करण्यात आलेल्या एकतीस फुटांच्या दगडी दीपमाळेने मंदिराच्या सौंदर्यात भर पडली आहे.

Crowds for darshan of Ekvira Devi in ​​Gabhara
Navratri festival : पूर्व भागात रंगणार तेलुगु भाषिकांचा ब्रतुकम्म; नऊ दिवसांचा पुष्पोत्सव महिलांसाठी आनंदोत्सव

पूर्णपणे दगडी बांधकाम असलेल्या नऊ मीटर उंचीची या दीपमाळेतल्या शंभरहून अधिक पारंपरिक दिव्यांनी या निमित्ताने मंदिराचा परिसर उजळून निघाला आहे. शांत, सौम्य अशा प्रकाशाने मंदिर परिसरातली प्रसन्नता राखण्यास हातभार लागला आहे.

मंदिराची ठळक वैशिट्ये

नांदगावचे आराध्यदैवत भगवती श्री एकवीरामाता नवसाला पावणारी आहे. अठरा भुजा असलेल्या एकावीरा देवीची धुळ्यात व नांदगाव अशा दोन ठिकाणी मूर्ती आहेत.

श्री एकवीरा देवीचे मंदिर गावाच्या पश्चिमेला शाखांबरी नदीच्या काठावरील असलेले मंदिर पेशवेकालीन असल्याची आख्यायिका आहे.

मंदिराच्या कामातील रेखीवपणा लक्ष वेधून घेतो. मंदिरासमोर भव्य व उंच अशी दगडी दीपमाळ असून, त्याच्या पायाशी गणेशाची मूर्ती मनोहारी अशी आहे.

Crowds for darshan of Ekvira Devi in ​​Gabhara
Navratri 2023 : नवरात्रीला आवर्जून करा हे खास उपाय, घरात नांदेल सुख-समृद्धी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com