vani saptashrungi devi
sakal
वणी (नाशिक) - सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते' या मंत्रोच्चाराचा मंगलध्वनी व आई राजा उदो उदो.. श्री सप्तशृंगी माते की जय अशा जयघोषात आद्यस्वयंभु शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर देवीची पंचामृत महापूजा व घटस्थापना करत देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास सुरवात झाली. भाविकांनी, बोल अंबे की जय, सप्तशृंगी माता की जय असा जयघोष करत सप्तशृंगी मातेचा मंदिर परिसर दणाणून सोडला.