सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सोहळा

सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सोहळा
Published on: 
पान-४ मेन--- चित्र वापरणे तयारी नवरात्रोत्सवाची--लोगो ------------------- शतचंडी यागसह धार्मिक विधींची रेलचेल ------------- रविवारपासून सुरवात, २५ ते २७ दरम्यान कोजागरी पौर्णिमेचा उत्सव रंगणार ------------- सकाळ वृत्तसेवा वणी, ता.८ : आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तशृंगी निवासिनी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सप्तशृंगगडावर रविवार (ता.११) ते मंगळवार (ता.२०) ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे पंचामृत महापूजा, घटस्थापना, पालखी पूजन व नगरप्रदक्षिणा, शतचंडी याग, होमहवन, ध्वजपूजन व ध्वजारोहण आदी धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहेत. त्यानंतर रविवार (ता.२५) ते मंगळवार (ता. २७) ऑक्टोबरदरम्यान कावडयात्रा अर्थात कोजागिरी पौर्णिमा उत्सव होणार आहे. --------------- रविवारी (ता.११) सकाळी सातला श्री भगवतीची पंचामृत महापूजा होईल. साडेनऊला घटस्थापना होऊन नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. नवरात्रोत्सवाच्या कालावधीत दररोज सकाळी सातला श्री भगवतीची पंचामृत महापूजा होणार आहे. सोमवारी (ता.१९) दुर्गाष्टमी हा यात्रोत्सवातील प्रमुख दिवस आहे. या दिवशी दुपारी दोनला श्री भगवती पालखी पूजन होऊन पालखीची नगरप्रदक्षिणा होईल. दुपारी साडेतीनला न्यासाच्या कार्यालयात ध्वजपूजन झाल्यानंतर ध्वजाचे मानकरी दरेगावचे गवळी पाटील यांच्या कुटुंबीयांकडे ध्वज सुपूर्द करण्यात येईल. त्यानंतर वाद्यांच्या गजरात ध्वजाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी पाचला श्री भगवती मंदिर सभामंडपात शतचंडी याग, होमहवन व पूजाविधी होणार आहेत. रात्री बाराला श्री भगवती शिखरावर किर्तीध्वजाचे ध्वजारोहण होईल. १६-१ विजयादशमीला शतचंडीयाग मंगळवारी (ता.२०) अश्विन शुद्ध नवमी व दशमी एकाच दिवशी येत असल्याने विविध धार्मिक विधी होणार आहेत. सकाळी सातला श्री भगवतीची पंचामृत महापूजा, तर सकाळी दहाला शतचंडी यागाची पूर्णाहुती होईल. त्यानंतर गडावर पारंपरिक पद्धतीने दसरा साजरा करण्यात येणार आहे. ग्रामस्थांतर्फे शतचंडी यागानंतर न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मानकरी व निश्चित प्रतिनिधींच्या उपस्थितीत परंपरेनुसार बळी देण्याचा विधी होणार आहे. १६-१ कावड यात्रेने उत्सवाला प्रारंभ रविवार (ता.२५) सकाळी ११.५६ ला कोजागिरी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ होईल. सकाळी सातला श्री भगवतीची पंचामृत महापूजा होणार आहे. दुपारी साडेबारा ते रात्री साडेआठपर्यंत महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातील विविध भागांतून कावडीधारकांनी आणलेले पवित्र जल श्री भगवती मंदिरात स्वीकारले जाईल. त्यानंतर रात्री नऊ ते मध्यरात्री बारापर्यंत या जलाने श्री भगवतीचा जलाभिषेक व पंचामृत महापूजा करण्यात येणार आहे. १६-१ मंगळवारी महाप्रसादाने सांगता सोमवारी (ता.२६) सकाळी सातला पंचामृत महापूजा होईल. सकाळी ९.४१ ला कोजागिरी पौर्णिमा समाप्त होईल. मंगळवारी (ता.२७) रात्री आठला शांतिपाठ होऊन महाप्रसादाच्या वाटपाने कोजागिरी पौर्णिमा उत्सवाची सांगता होणार आहे. नवरात्रोत्सव तसेच कोजागिरी पौर्णिमा उत्सवातील धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. --------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com