सपकाळ नॉलेज हबमध्ये रंगली गरबा नाइट

सपकाळ नॉलेज हबमध्ये रंगली गरबा नाइट
Published on: 
​फोटो -NSK26H32947 नाशिक : सपकाळ नॉलेज हब संलग्नित सर्व महाविद्यालयांच्या ''नवरात्रोत्सव -२०२६'' गरबा नाइटमध्ये विजेत्यांना पुरस्कार प्रदान करताना मान्यवर. सपकाळ नॉलेज हबमध्ये रंगली गरबा नाइट सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.१८ : पारंपरिक वेशभूषा, ढोल-तालावर थिरकणारी तरुणाई आणि गरबागीतांचा जल्लोष अशा उत्साही वातावरणात सपकाळ नॉलेज हबमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित ‘गरबा नाइट’ रंगली. कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सपकाळ नॉलेज हबशी संलग्न सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होत गरब्याचा आनंद लुटला. संस्थेच्या क्रीडांगणावर शुक्रवारी (ता. १६) झालेल्या या कार्यक्रमाला सपकाळ नॉलेज हबचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र सपकाळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सपकाळ उपस्थित होते. ‘गोरी राधा ने कालो कान’, ‘चोगाडा तारा’, ‘भला मोरी रामा’ यांसारख्या लोकप्रिय गरबागीतांवर विद्यार्थ्यांनी ठेका धरला. कार्यक्रमादरम्यान डॉ. रवींद्र सपकाळ आणि पराग सपकाळ यांनी उपस्थितांना प्रोत्साहन दिले. नवरात्रोत्सवाअंतर्गत आयोजित गरबा नृत्य स्पर्धेतील वैयक्तिक आणि समूह गरबा प्रकारांतील विजेत्यांना डॉ. रवींद्र सपकाळ यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे समन्वयक प्राचार्य डॉ. आर. एस. बच्छाव, प्रशासकीय अधिकारी डॉ. सचिन हारक, प्राचार्य डॉ. साहेबराव बागल, संचालक डॉ. आरती मोरे, प्राचार्या डॉ. दीप्ती फडतरे आदी उपस्थित होते. कोट... विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आमची संस्था नेहमी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असते. वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम ''अस्तित्व'' असो वा ''गरबा नाइट'' अशा कार्यक्रमांतून अभ्यासाचा वाण हलका होऊन वर्षभर उत्साह टिकवून राहतो. विद्यार्थी अगदी शिस्तीने सहभाग नोंदवितात. - डॉ. रवींद्र सपकाळ, अध्यक्ष, सपकाळ नॉलेज हब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com