Navratri Festival
sakal
नाशिक: आदिशक्तीची पारंपरिक पद्धतीने व भक्तिमय वातावरणात सोमवारी (ता. २२) घरोघरी घटस्थापना करण्यात आली. यासाठी महिलांची सकाळपासून लगबग सुरू होती. आरत्यांच्या गजरात आदिशक्तीच्या मंगलमय पर्वास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. घटस्थापनेने घरोघरी आदिमायेची उपासना मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली. यानिमित्त बाजारपेठेतही मोठा उत्साह जाणवला.