भारतातील मंदिराच्या फुलांची सजावट अन पुरुष-महिलांच्या एकत्र रांगा!

भारतातील मंदिराच्या फुलांची सजावट अन पुरुष-महिलांच्या एकत्र रांगा!
Published on: 
पान-१ मेन-- जोड घाटनदेवीचा असेल ------------ YEO26B27096---YEO26B27095 कोटमगाव : येथील जगदंबा मातेची मूर्ती व मंदिर परिसरात झालेली तयारी. ---------------- आदिमायेच्या चैतन्यपर्वाला आज सुरवात ------------- जगदंबामाता, घाटनदेवी, रेणुकादेवीच्या नवरात्रोत्सवासाठी तयारी पूर्ण,सुरक्षेसाठी सीसीटीव्हींची नजर ------------ सकाळ वृत्तसेवा येवला-इगतपुरी-चांदवड, ता. १० : श्री जगदंबेची ५१ शक्तिपीठे भूतलावर असून या शक्तीपिठापैकीच एक कोटमगावची श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती या तिन्ही स्थानाचे त्रिगुणात्मक रूप म्हणजे श्री जगदंबा माता, इगतपुरीची घाटनदेवी, चांदवडची रेणुकामाता आणि गडावरील सप्तशृंगीदेवीच्या नवरात्रोत्सवाला उद्यापासून (ता.११) सुरवात होत आहे. मंदिर व्यवस्थापनासाठी तयारी पूर्ण झाली असून भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर राहणार आहे. ---------------- राज्यभरातून कोटमगाव येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात, यंदा ही संख्या दहा लाखावर जाण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे दहा दिवस देवीच्या गाभाऱ्यात भारतातील प्रमुख मंदिराच्या प्रतिकृतीची फुलांची सजावट करण्यात येणार आहे. ट्रस्ट व ग्रामपंचायतने यात्रोत्सवाची तयारी पूर्ण केली आहे. येथे नवरात्रोत्सवात नगर, औरंगाबाद, नाशिक, धुळे आदी जिल्ह्यातील लाखो भाविक गर्दी करतात. मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून यात्रोत्सवाची जय्यत तयारी झाली आहे. रविवारी सकाळी साडे आठला कोपरगाव बेटाचे रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात येणार आहे. रोज सकाळी ८ तर रात्री ९ वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते महाआरती केली जाणार आहे. विशेष म्हणजे साडेबावीस तास मंदिर दर्शनासाठी खुले राहणार असून स्वच्छतेसाठी फक्त रात्री दीड ते साडेतीनच्या दरम्यान मंदिर बंद राहील. नवरात्रोत्स्वानिमित्त श्री जगदंबा मातेला २५ किलो चांदी आणि १० तोळे सोन्याच्या आभूषणांनी सजणार आहे. यंदा उत्सवातील दहा दिवस भारतातील प्रमुख मंदिराच्या प्रतिकृती फुलांच्या सजावटीच्या स्वरूपात गाभाऱ्यात करण्यात येणार आहे. दर दोन दिवसाला एक याप्रमाणे ही फुलांची सजावट असणार आहे. नवरात्रोउत्सवात प्रथमच मंदिर प्रशासनाने श्री. जगदंबा कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. ---------- यात्रा काळात महिला-पुरुषांसाठी वेगवेगळ्या असलेल्या दर्शन रांगा यंदा मंदिर प्रशासनाने एकच केल्या आहेत. आता महिला आणि पुरुष १६ दर्शन रांगांमधून एकत्रित दर्शन घेणार असून दर्शनासाठी यंदा गर्दीच्या वेळी एक तासाची वेळ कमी होऊन ४५ मिनिटात भाविकांना दर्शन मिळणार आहे. ४० सीसीटीव्ही परिसरात लावले आहेत. ग्रामपंचायतीने ५० व मंदिर प्रशासनाने १०० स्वयंसेवक दहा दिवस स्वछता आणि साफसफाईसाठी तैनात केले आहेत. नवरात्रोउत्सवाच्या काळात सुमारे २ हजार भाविक घटी बसण्याचा अंदाज असून घटी बसणाऱ्या भाविकांसाठी भक्त निवासाच्या ४२ खोल्या व ग्रामपंचायतीने खोल्या उपलब्ध करून दिल्या आहेत. दहा दिवस शहर पोलिस ठाण्यातर्फे पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली ५ पोलिस अधिकारी, ४५ पोलिस कर्मचारी व ४० होमगार्ड मंदिर परिसरात तैनात राहणार आहेत. दरम्यान खाद्य, खेळणी व इतर विक्रेत्यांची सुमारे ५५० दुकाने उभारण्यात आल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे, व्यवस्थापक राजेंद्र कोटमे व ग्रामविकास अधिकारी तरवडे यांनी दिली आहे. ------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com