गणेशोत्सव निर्विघ्न; लक्ष्य आता नवरात्रोत्सवाचे

गणेशोत्सव निर्विघ्न; लक्ष्य आता नवरात्रोत्सवाचे
Published on: 
पोलिसांकडून मंडळांना अटी-शर्तीसह परवानग्या उल्लंघन केल्यास कारवाई; ५० हजारांची अनामत रक्कम भरणे बंधनकारक सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १० : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयाकडून सुमारे सातशे मंडळांसह, गरबा आयोजकांना अटी-शर्तीसह परवानगी दिलेल्या आहेत. विशेषतः गणेशोत्सवाप्रमाणेच, सार्वजनिक मंडळांना एक लाख तर, खासगी आयोजकांना ५० हजारांची अनामत रक्कम संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये भरणे बंधनकारक केले आहे. नियमांचे पालन करण्याची जबाबदारी संबंधित मंडळाचे पदाधिकारी वा गरबा आयोजकांवर असेल. नियमांचा भंग करणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशाराही शहर पोलिसांनी दिला आहे. शहरात नुकताच गणेशोत्सव निर्विघ्न पार पडला. विशेषतः शहरात प्रथमच मध्यरात्रीनंतर गणेश विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्यांत पार पडली. आयुक्त संदीप कर्णिक यांच्या पुढाकाराने गणेशोत्सव उत्साहात पार पडला. त्याच धर्तीवर नवरात्रोत्सवही निर्विघ्न होण्यासाठी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. मर्यादित डीजेच्या वापराला परवानगी असली तरी लेझर लाईटवर मात्र बंदी आहे. तसेच गरबा, दांडियाचे आयोजन करणाऱ्या मंडळांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. नियमांचे पालन न केल्यास आयुक्तालयाकडून संबंधित मंडळ आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला. गरबा- दांडियासाठी मंडळांकडून परवानगीसाठी अर्ज केले आहेत. ---चौकट अशा आहेत अटी-शर्थीं - परिमंडळनिहाय सातशे मंडळ व गरबा आयोजकांनी परवानगीसाठी अर्ज केले. - मुंबई उच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक - मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करण्याची मुख्य जबाबदारी संबंधित मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी, तसेच गरबा आयोजक-संयोजकांवर - डीजेचा वापर मर्यादित डेसिबलमध्येच करणे बंधनकारक - लेझर लाईटवर बंदीसह १३ नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक - सार्वजनिक मंडळांना एक लाखांची तर, खासगी मंडळांना ५० हजारांची अनामत रक्कम जमा करणे बंधनकारक --कोट फोटो : H31895 पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रोत्सवासाठी कडेकोट नियोजन केले आहे. नवरात्रोत्सव मंडळ व गरबा आयोजकांना अटी-शर्तीसह परवानग्या दिल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित मंडळांचे अध्यक्ष व गरबा आयोजकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. - किशोर काळे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com