नवरात्रोत्सवाच्या स्वागतासाठी बाजारपेठेत चैतन्य खरेदीसाठी भाविकांची गर्दी; पूजासाहित्य, फुले, सजावटीच्या वस्तूंना मागणी

नवरात्रोत्सवाच्या स्वागतासाठी बाजारपेठेत चैतन्य
खरेदीसाठी भाविकांची गर्दी; पूजासाहित्य, फुले, सजावटीच्या वस्तूंना मागणी
Published on: 
(फोटोसाठी ३ कॉलम जागा सोडावी) --- नवरात्रोत्सवाच्या स्वागतासाठी बाजारपेठेत चैतन्य खरेदीसाठी भाविकांची गर्दी; पूजासाहित्य, सजावटीच्या वस्तूंना मागणी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १० : शक्तीची उपासना आणि भक्तीचा जागर करणाऱ्या नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ होत असल्याने शहरातील बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. देवीच्या स्वागतासाठी घरोघरी तयारी सुरू असून, पूजासाहित्य, फुले, हार, नारळ, चुनरी, घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य तसेच सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत भाविकांची गर्दी वाढली आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनीही विविध वस्तूंची दुकाने सजविली असून, बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे. घटस्थापनेसाठी लागणारे कलश, नारळ, सुपारी, हळद-कुंकू, अक्षता, अगरबत्ती, कापूर आणि पूजेच्या इतर साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. देवीच्या पूजेसाठी झेंडू, गुलाब यांसह विविध फुलांची मागणी वाढली आहे. फुलांचे हार, तोरणे आणि सजावटीच्या माळांनी बाजारपेठ सजली आहे. देवीसाठी लागणारी चुनरी, साडी, ओढणी, अलंकार आणि पूजेच्या इतर वस्तू खरेदी करण्यासाठी भाविक दुकानदारांकडे गर्दी करत आहेत. घटस्थापनेसाठी तयारी घरोघरी घटस्थापना करण्यासाठी लागणारे मातीचे घट, पूजेची ताटे, दिवे आणि इतर साहित्य खरेदी केले जात आहे. घरातील देवघर, मंडप आणि सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या सजावटीसाठी आकर्षक विद्युत रोषणाई, तोरणे, पडदे आणि विविध सजावटीच्या वस्तूंना पसंती मिळत आहे. सार्वजनिक मंडळांकडूनही तयारी शहरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी देवीच्या प्रतिष्ठापनेसाठी तयारी सुरू केली आहे. उपवासाच्या पदार्थांचीही खरेदी नवरात्रोत्सवात अनेक भाविक उपवास करतात. त्यामुळे साबुदाणा, शेंगदाणे, राजगिरा, भगर, वरी, उपवासाचे पीठ आणि इतर फराळाच्या पदार्थांच्या खरेदीलाही महत्त्व आले आहे. किराणा दुकानांमध्ये उपवासाच्या पदार्थांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे. देवीची आरती, भजन, गरबा आणि दांडियाच्या कार्यक्रमांमुळे पुढील नऊ दिवस शहरात उत्साहाचे वातावरण राहणार आहे. (ग्राफ) पूजेच्या साहित्याचे दर घट : ५० रुपये टोपली : ६० ते ७० रुपये नारळ : ४० रुपये दिवे : ५० ते ३०० रुपये नग फुलहारा जाळी : २५० रुपये झाडू : ५० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com