फोटो : NSK26H32946
नंदुरबार : स्त्रीशक्तीचा जागर करताना श्रॉफ हायस्कुलच्या विद्यार्थीनी.
---------------
नवदुर्गेच्या नऊ रूपांनी खुलला नवरात्रोत्सव
श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूलमध्ये स्त्रीशक्तीचा जागर
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १८ : येथील श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूलमध्ये नवरात्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा झाला. विद्यार्थिनींनी साकारलेली नवदुर्गेची नऊ रूपे हा कार्यक्रम विशेष आकर्षणबिंदू ठरला. आकर्षक वेशभूषा, देखणा साजशृंगार आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणातून विद्यार्थिनींनी देवीच्या विविध रूपांचे प्रभावी दर्शन घडविले.
कार्यक्रमाला संस्थेच्या समन्वयक सुषमा शाह, मुख्याध्यापक प्रशांत बागूल, उपमुख्याध्यापक भिकू त्रिवेदी, पर्यवेक्षिका सीमा पाटील आणि पर्यवेक्षक सुनील शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्कृती पाटील, रिद्धी आगाव, आर्या वंजारी, रेवा मोची, आराध्या चौधरी, मानवी पुरोहित, निशा मोरे, स्वराली माळी आणि प्रणाली माळी यांनी विविध देव्यांची भूमिका साकारली. निल उमराणकर या विद्यार्थ्यांने महिषासुराची भूमिका केली. अनघा जोशी, पल्लवी चव्हाण आणि आशा राजपूत यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. योगेश शास्त्री आणि विद्यार्थिनी ज्ञानदा चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. संगीत शिक्षिका अनघा जोशी व त्यांच्या चमूने महिषासुरमर्दिनी स्तोत्र सादर केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी केशव राजभोज, देविदास पाटील, शिवाजी माळी, हेमचंद्र मराठे, सुनील चव्हाण यांनी सहकार्य केले.