गरबा-दांडियासाठी तरुणाईमध्ये टॅटूची क्रेझ

गरबा-दांडियासाठी तरुणाईमध्ये टॅटूची क्रेझ
Published on: 
ॲंकर NSK26H32184 (संग्रहित छायाचित्र) --- गरबा-दांडियासाठी तरुणाईमध्ये ‘टॅटू’ची क्रेझ नवरात्रोत्सवात हटके लूकसाठी धडपड; आकर्षक डिझाइनला पसंती सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १३ : नवरात्रोत्सव म्हटले की रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख, घागरा-चोळी, कुर्ता, दागिने आणि गरबा-दांडियाच्या तालावर थिरकणारी तरुणाई असे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. यंदा या पारंपरिक उत्साहाला आधुनिक फॅशनची जोड मिळाली असून, गरबा-दांडियासाठी आकर्षक टॅटू काढून घेण्याची क्रेझ तरुणाईमध्ये वाढताना दिसत आहे. कपडे आणि दागिन्यांसोबतच हातांवर, मनगटावर, मानेजवळ तसेच चेहऱ्यावर लावले जाणारे नक्षीदार टॅटू तरुणांच्या लूकचा महत्त्वाचा भाग बनले आहेत. नवरात्रोत्सवातील गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये आपला लूक इतरांपेक्षा वेगळा असावा, यासाठी तरुण-तरुणी विशेष तयारी करतात. त्यासाठी पारंपरिक पोशाखांची निवड, त्याला साजेसे दागिने, रंगसंगती आणि मेकअप यांचे नियोजन केले जाते. यंदा या तयारीत टॅटूची भर पडली आहे. विशेषतः तात्पुरत्या टॅटूंचा वापर करून कमी वेळेत आकर्षक लूक मिळवण्याकडे अनेकांचा कल आहे. पारंपरिक नक्षीकामाला पसंती गरबा-दांडियासाठी हातावर मेहंदीच्या धर्तीवरील नक्षीकाम, मंडला डिझाइन, फुलांची नक्षी, चंद्र-तारे, छोटे धार्मिक चिन्ह, गुजराती शैलीतील आकृत्या तसेच रंगीबेरंगी ग्लिटर टॅटू यांना पसंती दिली जात आहे. तरुणींकडून हाताच्या मनगटावर, बोटांजवळ आणि हाताच्या मागील बाजूस नाजूक डिझाइन निवडले जात आहे. तरुणांमध्ये हातावर, दंडावर आणि मानेजवळ उठून दिसणाऱ्या डिझाइनची आवड दिसते. फोटो अन् रिल्ससाठी... गरबा-दांडियाच्या कार्यक्रमात नृत्य करताना आणि मित्र-मैत्रिणींसोबत फोटो काढताना टॅटूमुळे लूक अधिक आकर्षक दिसतो, अशी तरुणाईची धारणा आहे. सोशल मीडियावर फोटो आणि रिल्स शेअर करण्यासाठीही विविध डिझाइनचा वापर केला जात आहे. पारंपरिक पोशाखांवर उठून दिसणारे टॅटू, त्यासोबत रंगीबेरंगी बांगड्या आणि दागिने यांची सांगड घालण्याकडे तरुणाईचा कल आहे. चौकट तात्पुरत्या टॅटूंना पसंती नवरात्रोत्सव काही दिवसांचा असल्याने कायमस्वरूपी टॅटू काढण्याऐवजी तात्पुरत्या टॅटूंना अनेकांकडून पसंती दिली जाते. स्टिकर टॅटू, ग्लिटर टॅटू आणि त्वचेवर काही काळ टिकणाऱ्या डिझाइनचा वापर केला जातो. कार्यक्रमानंतर सहज काढता येत असल्याने आणि पोशाखानुसार डिझाइन बदलता येत असल्याने हे पर्याय आकर्षक ठरत आहेत. नवरात्रोत्सवात गरबा-दांडियाचा आनंद घेताना पारंपरिक संस्कृतीसोबत आधुनिक फॅशनचा मिलाफ पाहायला मिळत आहे.
Marathi News Esakal
www.esakal.com