Latest Marathi News | Navratrotsav 2022 : श्रीफळ खाणार ‘भाव’!; 2 वर्षांच्या तुलनेत यंदा मागणीत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Coconuts

Navratrotsav 2022 : श्रीफळ खाणार ‘भाव’!; 2 वर्षांच्या तुलनेत यंदा मागणीत वाढ

बिजोरसे (जि. नाशिक) : दोन वर्ष गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने उत्सवाशी संबंधित सर्वच व्यवसायांच्या आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला होता. सर्व मंदिरे, यात्रोत्सव, धार्मिक पूजा यंदा सुरू झाल्या. गणेशोत्सवात पूजा व तोरणासाठी नारळाच्या मागणीत मोठी वाढ झाली. गणेशोत्सवात नारळ विक्रीत दोन वर्षाच्या तुलनेने २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. (Navratrotsav 2022 Increase in coconut demand compared to 2 years Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: चालक दिन विशेष : लेकींना हवाई सुंदरी बनविण्यासाठी रिक्षाचालक आईची पराकाष्ठा

किरकोळ बाजारात एका नारळाची किंमत २० ते ३० रुपयांदरम्यान आहे. कोरानामुळे धार्मिक उत्सवांवर निर्बंध असल्यामुळे नारळ विक्रीवर परिणाम झाला होता. आता निर्बंध नसल्याने नारळ विक्रीत वाढ झाली आहे. तमिळनाडू, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातून नारळांची आवक मोठ्या प्रमाणात कसमादे पट्ट्यात होते. तमिळनाडूतून नव्या नारळांची आवक होत आहे. कर्नाटकातून येणाऱ्या ‘मद्रास सापपोल’ जातीच्या नारळाला मागणी आहे.

नारळाचे दर (शेकडा)

प्रकार दर (रुपयांमध्ये)
नवा नारळ १२५० ते १४५०
पालकोल १४०० ते १६००
मद्रास २२०० ते २६००
सापसोल १८०० ते २३००

"आंध्रप्रदेशातून ‘पालकोल’ जातीच्या नारळाची आवक होते. खाद्य पदार्थांमध्ये नारळाचा वापर होत असल्याने हॉटेल व्यावसायिकांकडून मागणी असते. पितृपक्षात विक्रीचे प्रमाण काहिसे कमी झाले. पुढील आठवड्यापासून नवरात्रोत्सव सुरू होणार असून, सर्व मंदिरे खुली करण्यात आल्याने नारळाच्या मागणीत वाढ होईल." - संजय राणा, व्यापारी

हेही वाचा: Nashik : खचलेल्या रस्त्याची NMC आयुक्तांकडून पाहणी

Web Title: Navratrotsav 2022 Increase In Coconut Demand Compared To 2 Years Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..