Nashik Loksabha Election: नाशिक लोकसभेच्या दाव्याने महाविकास आघाडीत ‘ट्विस्ट’; ठाकरे सेनेची उघड नाराजी

Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadisakal
Updated on

Nashik Loksabha Election : लोकसभा निवडणुका जवळ येत असताना अनेकांच्या इच्छांना निवडणुकीचे धुमारे फुटू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नाशिक दौऱ्यानंतर प्रामुख्याने अनेकांच्या इच्छा लपून राहिल्या नाही. (ncp claiming Nashik Lok Sabha seat twist in maha vikas aghadi news)

नाशिक लोकसभेसाठी काहींनी दावाच केल्याने त्यावर शिवसेनेने व्यक्त झाली असून, नाशिकच्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार असताना राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवर दावा करणे योग्य नसल्याचे सांगताना नाशिकच्या जागेसाठी शिवसेनेने दंड थोपटले आहे. त्यामुळे निवडणुकीआधी महाविकास आघाडीत ट्विस्ट निर्माण झाले आहे.

छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश व तेलंगण राज्याच्या विधानसभेचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यातील तीन राज्यात भाजपने बहुमताचे सरकार स्थापन केले. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षाकडून सुरू झाली आहे. लोकसभेसाठी सत्ताधारी व विरोधकांकडून इच्छुक मोठ्या प्रमाणात तयार झाले. निवडणुकीला अद्याप चार- पाच महिने शिल्लक असले तरी इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून इच्छुक तयारीला लागले आहेत. महायुतीत दिंडोरी लोकसभेची जागा भाजपकडे, तर नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेकडे आहे. परंतु आता महायुतीतील शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गट व एकनाथ शिंदे गट, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार व अजित पवार गट पडले आहेत.

Mahavikas Aghadi
Loksabha Election : 'लोकसभा निवडणुकीत महायुतीचे 400 खासदार निवडून येणार आणि मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार'

महायुतीतील शिवसेनेचा ‘उबाठा’ गट व राष्ट्रवादीतील शरद पवार गट महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहे. महायुतीतील भाजप- शिंदे-पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीतील जागांची वाटणी झालेली नसली तरी अधिकाधिक जागा भाजप पदरात पाडून घेण्याच्या तयारीत आहे. महाविकास आघाडीतील उबाठा गट व राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गटाने जागा वाटपाचे सूत्र अद्याप निश्‍चित केले नसले तरी ज्या जागांवर ज्या पक्षाचा खासदार प्रथम त्याचं पक्षाला तेथून उमेदवार करता येणार असल्याचे धोरण आहे.

असे असतानाही शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर जागा वाटपाचे सूत्र ठरले नसल्याचे वक्तव्य केले जात असल्याने त्याचा परिणाम महाविकास आघाडीतील धुसफुस वाढण्यावर दिसून येत आहे. दरम्यान, मागील दोन टर्ममध्ये उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचा उमेदवार निवडून आलेला आहे.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपातदेखील नाशिकवर शिवसेनेचाच (उबाठा) दावा आहे. जो काही निर्णय व्हायचा तो वरिष्ठ घेतील. स्थानिक पातळीवर कोणी काहीही वक्तव्य न केलेले बरे, ठाकरे सेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले.

यामुळे फुटले वादाला तोंड

खासदार शरद पवार यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने शिवसेना (उबाठा) गटाच्या नेत्यांनी भेट घेतली. त्या वेळी निवडणुकीच्या वातावरण तसेच तयारीबद्दल चर्चा करण्यात आली. परंतु त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमचं अजून ठरलेलं नसल्याचे सांगण्यात आल्याने त्यातून महाविकास आघाडीत नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Mahavikas Aghadi
Loksabha Election 2024: राम मंदिर, कलम 370, लाभार्थी, मोदींची गॅरंटी ... ही भाजपची २०२४ जिंकण्याची स्कीम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com