धुळे : टुडे पान २ साठी..
--
फोटो क्रमांक : 32905
धुळे : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आढावा बैठकीस उपस्थित पदाधिकारी.
--
धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसची
संघटनात्मक आढावा बैठक
--
बीएलए नियुक्तीसह ‘एसआयआर’चा आढावा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १८ : जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार यादी सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियान प्रभावीपणे राबविणे तसेच तातडीने बीएलए नियुक्त करण्याबाबत जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. माजी मंत्री अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आढावा झाली. मतदार यादी पुनरीक्षणाचे काम वेळेत, अचूक आणि जबाबदारीने पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांवर शासनाकडून कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही, पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी भूमिका अनिल पाटील यांनी मांडली. पक्षसंघटनेचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देत सोपविलेल्या जबाबदारीत कसूर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. बैठकीस माजी आमदार शरद पाटील, फारुक शाह, रामकृष्ण पाटील, जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, प्रदेश प्रवक्ते शामकांत सनेर, प्रदेश सचिव किरण शिंदे, शिंदखेड्याच्या नगराध्यक्षा कलावती माळी, जिल्हा महिला अध्यक्ष संजीवनी गांगुर्डे, नगरसेवक डॉ. सर्फराज अन्सारी, सादिक शेख, रफिक शेख, गणेश जाधव, डॉ. दिनेश बच्छाव, पोपटराव सोनवणे, कामराज निकम, प्रकाश पाटील, राजेंद्र देवरे, शामकांत पाटील, सुमित पवार, जया साळुंखे, जोसेफ अण्णा मलबारी, नाना पवार, अनिल मुंदडा, उमेश महाले, आनंद सैंदाणे, महेंद्र शिरसाट, कांतीलाल दाळवाले, सुभाष माळी, नरेंद्र पाटील, कैलास आखाडे, पंजाबराव पवार, माधव देवरे, महेंद्र पाटील, नंदू पाटील, बाळकृष्ण पाटील, राजेश बागुल, पंकज भामरे, किरण पाटील, कुणाल पवार, गुड्ड्या आघाव, शितल देवरे, अभिजीत देवरे, गीतांजली जाधव, योजना हिरे, मोहिनी जाधव, शोयब सय्यद आदी उपस्थित होते.