NDVS Bank Election : पॅनलच्या नेत्यांना उमेदवार निवडीची डोकेदुखी!

व्यापारी बँकेच्या निवडणुकीतील वैध उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध
NDVS Bank Election
NDVS Bank Electionesakal

NDVS Bank Election : नाशिक रोड- देवळाली व्यापारी बँकेच्या वैध १२४ उमेदवारांची यादी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा खैरनार यांनी सकाळी ११ वाजता डीडीआर कार्यालयात व बँकेत नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली.

निवडणुकीतील उमेदवार १ जूनपर्यंत माघार घेऊ शकतील. त्या दरम्यान पॅनलची निर्मिती होऊन प्रचाराला वेग येईल. दरम्यान, सत्तारूढ संचालकांचा सहकार पॅनल, तसेच विरोधकांनी परिवर्तन पॅनल नाव देऊन बिटको चौकात आपली प्रचार कार्यालये थाटली आहे. (NDVS Bank Election List of Valid Candidates for Merchant Bank Elections Released nashik news)

दोन्ही पॅनलच्या नेत्यांना उमेदवार निवडीची डोकेदुखी सुरू झाली आहे. बहुतेकांचा ओढा सत्तारूढ पॅनलकडे असल्याचे बोलले जाते. सर्वसाधारण १६ जागांसाठी ७६ उमेदवारांतून दोन्ही पॅनलचे मिळून ३२ उमेदवार निवडायचे आहे.

दोन्ही पॅनलमध्येच लढत होईल, असे दिसते. उर्वरित उमेदवारांतून काय होते, अपक्ष की तिसरा पॅनल हे माघारीच्या वेळेस ठरेल. महिला राखीव गटात दोन महिला निवडायच्या आहेत. दोन्ही पॅनलच्या मिळून चार महिला अकरा इच्छुक महिलांतून निवडायचे आहेत.

त्यामुळे महिलांमध्येही चुरस आहे, तसेच इतर मागास प्रवर्गातून एका जागेसाठी १७ उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. त्यातून एकेक निवडणे दोन्ही पॅनलच्या नेत्यांना अवघड जाणार आहे.

तसेच भटक्या विमुक्त जाती वर्गातून एका जागेसाठी दहा उमेदवारी अर्ज असल्याने त्यातून एकेक निवडणे, तसेच अनुसूचित जाती- जमाती गटातील एका जागेसाठी पाच उमेदवारी अर्ज असल्याने सोईचा उमेदवार निवडणे दोन्ही पॅनलला मुश्कील ठरणार आहे.

कारण ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांची मनधरणी करणे आणि आपापल्या पॅनलकडे ओढून घेऊन प्रचारास लावणे हे नाजूक काम करताना दोन्ही पॅनलचे नेत्यांची कसरत होणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NDVS Bank Election
MBBS Admission : पुण्यात रविवारी एमबीबीएस ॲडमिशन महाकुंभ; जाणुन घ्या सर्वकाही

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट पीटिशनवर सुनावणी होऊन निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप न करण्याचा न्यायालयाचा निर्णय असून सहकार मंत्र्यांनी पोटनियम ४० ला दिलेल्या स्थगिती आदेशावर चार आठवड्यात निर्णय देण्याचे सांगितले आहे.

ही निवडणूक मात्र अतिशय चुरशीची अटीतटीची होईल असे दिसते. विद्यमान संचालकाच्या सर्वसाधारण गटातील १६ संचालकांपैकी डॉ. डी. जी. पेखळे व भाऊसाहेब पाळदे हे दोन संचालक मयत झाले असून, एक विरोधी गटात गेल्याने तीन संचालक नव्याने घेतले जातील.

त्यातही कदाचित एखादा संचालक बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील निवडणुकीत रमेश धोंगडे हे विरोधी पॅनलमधून निवडून आले होते. त्यांचेही भवितव्य काय, हा प्रश्न आहे.

तसेच भटक्या विमुक्त जाती गटातील श्याम चाफळकर हे संचालक दिवंगत झाल्याने त्यांच्या एका जागेवर त्यांच्या मुलाला संधी मिळते की, दुसऱ्या कोणाला घेतले जाते याकडेही लक्ष वेधले आहे. कारण या गटात पाच उमेदवारी अर्ज आलेले आहेत.

NDVS Bank Election
Teacher Transfer : शिक्षकांच्या अन्यायकारक बदल्यांना 7 जूनपर्यंत स्थगिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com