Nashik News : नव्या वर्षात उशिराचा Episode संपवावा; प्रवाशांची माफक अपेक्षा

panchavati express
panchavati expressesakal

नाशिक रोड : अनेक दिवसांपासून पंचवटी, राज्यराणी उशिरा चालते. त्यामुळे चाकरमान्यांसह व्यावसायिक, विद्यार्थी, महिलांना इच्छित स्थळापर्यंत पोचण्यासाठी रोजच लेट होत आहे. निवेदन दिल्यावर दुसऱ्या दिवशी पंचवटी वेळेत चालते.

त्यानंतर पुन्हा लेट चालण्याचा इपिसोड घडतो. त्यामुळे पंचवटी आणि राज्यराणी या नाशिककरांच्या रेल्वेसाठी कायमस्वरूपी शाश्वत उपाययोजना करायला पाहिजे, असे मत मनमाड, नाशिक इगतपुरीच्या प्रवाशांनी व्यक्त केले आहे. नवीन वर्षात पंचवटी आणि राज्यराणी एक्स्प्रेस च्या समस्या सुटल्या पाहिजे, अशी मागणी प्रवाशांनी ‘सकाळ’ कडे व्यक्त केली आहे. (Need for sustainable measures for Panchavati Rajya Rani express nashik news)

पंचवटी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांचे कुटुंब निर्माण झाले आहे. मात्र, ही गाडी लेट चालत असल्यामुळे वैविध्यपूर्ण अडचणींना प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. मंत्रालय, बँक कस्टम, कोर्ट, खासगी कंपनी, शाळा, महाविद्यालय, इन्शुरन्स कंपनी, महावितरण, रेल्वे बोर्ड, पोलिस खात्यासह विविध ठिकाणी नाशिकचे नोकरदार नोकरी करतात.

शिवाय विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवास करता महिला नोकरदारांची संख्या या गाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर असते. मात्र, ही गाडी लेट चालत असल्यामुळे इच्छितस्थळी पोचण्यास रोजच वेळ होतो. पर्यायाने लेट मार्क, आर्थिक नुकसान, काम न होणे यासारख्या समस्यांना नाशिककरांना सामोरे जावे लागते.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

panchavati express
Nandurbar News : नायलॉन मांजाच्या विक्री-वापरास प्रतिबंध; जिल्हाधिकारी खत्री यांचे निर्देश

म्हणून पंचवटी एक्स्प्रेस वेळेवर चालण्यासाठी शाश्वत उपाययोजना करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे. किरण बोरसे, राजेश फोकणे, दीपकहेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक कोरगावकर, कैलास बर्वे, सुदाम शिंदे, प्रवासी दत्ताराम गोसावी, अनिल घनदाट यांनी पंचवटी वेळेवर चालण्यासाठी शाश्वत उपाययोजनांची मागणी केली आहे.

"दिवसभराचे नियोजन पंचवटी एक्स्प्रेसवर अवलंबून असते. पंचवटी वेळेत धावण्यासाठी रेल्वेने विशेष काळजी घ्यावी. प्रवासी या गाडीवर अवलंबून राहून आपले दिवसभराचे नियोजन करीत असतात. किमान जाताना तरी पंचवटी वेळेत धावली तर नाशिककरांचे संभाव्य नुकसान होणार नाही." - बंडू महानुभाव, प्रवासी

panchavati express
Dhule News : PWDत लेखणीबंद आंदोलन; कार्यकारी अभियंत्यांविरुद्ध कमर्चाऱ्यांतर्फे ‘असहकार’चा इशारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com