सिन्नर- कांद्याला सातत्यपूर्ण उत्पादन खर्चापेक्षा अधिक दर मिळविण्यासाठी देशांतर्गत बाजारपेठेसह जागतिक बाजारपेठेत कांद्याचा मोठा ग्राहकवर्ग शोधणे गरजेचे आहे. ही जागतिक बाजारपेठ काबीज करण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटनेच्या नेतृत्वाखाली संघटित होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी शेतकऱ्यांच्या संवाद मेळाव्यात केले.