Nashik : बसफेऱ्या वाढविण्याची गरज; प्रवाशांची नांदगाव आगाराकडे मागणी

MSRTC bus
MSRTC busesakal

नांदगाव (जि. नाशिक) : एसटी (ST) कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ चाललेल्या आंदोलनानंतर (ST Strike) आता येथील आगारातून नियमितपणाने बससेवा सुरु झाली आहे. मात्र, ज्या तुलनेने नाशिक मार्गावर बसेस सुटतात त्या तुलनेने अन्य मार्गावर बसेस सुटाव्यात, अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली. (Need to increase bus services Demand of passengers towards Nandgaon depot Nashik News)

MSRTC bus
पालकमंत्र्यांचा आढावा की झाडाझडती?

पूर्ण क्षमतेने सध्या प्रवासी वाहतूक सुरु असली तरी मालेगावहून नांदगावला येण्यासाठी सायंकाळी सातनंतर बस नसल्याने दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. येथील आगाराच्या वेळापत्रकात वाढ होण्याची आवश्यकता आहे. सध्या १६० हून अधिकच्या फेऱ्या करण्यात येत असल्या तरी त्यात वाढ होण्याची आवश्यकता आहे. भुसावळ- पुणे दरम्यान फेऱ्यांची पूर्वीप्रमाणे वाढ होण्याची आवश्यकता आहे. जुन्या वेळापत्रकाप्रमाणे पुर्ववत बस सुरु झाल्या तर महामंडळाच्या येथील आगाराला आपली आर्थिक घडी बसविणे शक्य होणार आहे.

MSRTC bus
व्‍यथा ज्‍येष्ठांच्‍या : पेन्‍शन र‍कमेतून औषध खरेदीही मुश्‍कील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com