NSK26H33085
जळगाव : नेहरू चौक येथे शस्त्रपूजनप्रसंगी उपस्थित खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे आदी मान्यवर.
...............
नेहरू चौक मित्रमंडळात शस्त्रपूजन सोहळा
परंपरेचे ४३ वे वर्ष; मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजपूजनही उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २० : विजयादशमीनिमित्त श्री नेहरू चौक मित्र मंडळातर्फे मंगळवारी (ता. २०) पारंपरिक शस्त्रपूजन व ध्वजपूजन सोहळा उत्साहात पार पडला. मंडळाच्या या परंपरेचे यंदा ४३ वे वर्ष होते. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करून परंपरेचे जतन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. त्यानंतर ध्वजस्तंभाचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी मोघे, भाजपचे पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महापालिकेतील भाजपचे गटनेते प्रकाश बालाणी, नगरसेवक सागर सोनवणे, जळगाव पीपल्स बँकेचे माजी अध्यक्ष भालचंद्र पाटील, केशव स्मृती समूहाचे अध्यक्ष भरत अमळकर, ॲड. विपिन पाटील, दिलीप गांधी, शैलेश ठाकरे, संदीप रडे आणि नेहरू चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष अजय गांधी उपस्थित होते. यशस्वितेसाठी नेहरू चौक मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.