टिप: मुख्य अंकात प्रसिद्ध करावी ही विनंती. शिक्षकांच्या हक्कांसाठी २ नोव्हेंबरला मुंबईत ‘नई तालिम यात्रा’ : कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण हक्कांसाठी एल्गार

टिप: मुख्य अंकात प्रसिद्ध करावी ही विनंती.  शिक्षकांच्या हक्कांसाठी २ नोव्हेंबरला मुंबईत ‘नई तालिम यात्रा’ : कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण हक्कांसाठी एल्गार
Published on: 
शिक्षक भारतीतर्फे सोमवारी नई तालीम यात्रा ------------------------------------ प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधणार सकाळ वृत्तसेवा मालेगाव शहर,ता.२७ : शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीतर्फे सोमवारी (ता .२) मुंबईत ‘नई तालिम यात्रा’ काढण्यात येणार आहे. माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या यात्रेत राज्यभरातील हजारो शिक्षक सहभागी होणार आहेत.महात्मा गांधी यांना अभिवादन करून नाना चौक ते ऑगस्ट क्रांती मैदान आणि पुढे मणिभवन, मुंबई असा या यात्रेचा मार्ग राहणार आहे. शिक्षणाचा हक्क, शिक्षकांचे सेवाविषयक प्रश्न आणि सरकारी शाळांचे अस्तित्व यांसह विविध मागण्यांसाठी या यात्रेच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. आंदोलनाच्या निमित्ताने वस्तीशाळा शिक्षकांची पूर्वीची सेवा ग्राह्य धरून सेवेत जोडण्यात यावी, कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यात येऊ नयेत, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकांवरील टीईटीची सक्ती रद्द करावी, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नयेत, ऑनलाईन शैक्षणिक कामे बंद अशा प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत. याशिवाय मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करून ३० किलोमीटरच्या परिघातील क्षेत्र मुख्यालय म्हणून ग्राह्य धरण्यात यावे.या मागण्यांसह शिक्षकांचे इतर प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत आणि शासनाने त्यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, या उद्देशाने यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटितपणे आवाज उठविण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. सेवा जोडण्यासह शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी राज्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने मुंबईत उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीतर्फे करण्यात आले आहे. या यात्रेच्या पूर्वतयारीचे नियोजन करण्यासाठी रविवारी (ता.२५) मुंबई येथे बैठक झाली. बैठकीला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड, राज्य सरचिटणीस भरत शेलार, राज्य कोषाध्यक्ष किशोर कदम, राज्य उपाध्यक्ष विनोद कडव, राज्य प्रवक्ते सतीश हुले, हरिश साळुंखे आणि भाऊसाहेब धिवर आदींसह राज्य पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com