'काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल...' आता गाणंबी व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

marathi viral song

'काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल...' आता गाणंबी व्हायरल

वीरगाव (दि. नाशिक) : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात (Politics) मोठा भूकंप झाल्याचं पाहायला मिळत आहे. या दरम्यान शिवसेनेचे (shiv sena) सांगोला तालुक्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (MLA Shahji Bapu Patil) यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल (Viral) झाली. याची सध्या सोशल मीडियात (Social Media) चांगलीच चर्चा होत आहे. 'काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल... ओकेमध्ये हाय...' अशी ऑडीओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली. आता यावर एक गाणं (Song) बनवण्यात आलं आहे. (new marathi song released on mla shahaji bapu patil dialogue Kay Jhadi Kay dongar kay hatil Maharashtra Political News)

शहाजीबापू यांच्या व्हायरल कॉलनंतर मिम्सचा सोशल मीडियावर महापूर आला. त्यातच आता या नव्या गाण्यानं सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्राच्या आजच्या राजकारणावर अनेक जोक,मिम,कार्टून गाजत असताना ह्या गाण्याने एन्ट्री केली. यू ट्यूब वर ह्या गाण्याने अवघ्या काही तासातच लाखो व्हीवर्स मिळवले आहेत.एस के ब्रदर्स यांनी संगीत दिलेल्या या गाण्याला गायक सचिन जाधव यांनी आवाज दिला आहे. लवकरच हे गाणे लग्नातील बँड व डिजे वर एकावयास मिळेल एवढी प्रसिद्धी या गाण्याला मिळत आहे. ग्रामीण भागात तर प्रत्येकाच्या मोबाईल वर हे गाणे ऐकायला मिळते तर काही बहाद्दर मंडळीने चक्क रिंगटोन ला पण हे गाणे ठेवले आहे. शहरासह ग्रामीण भागात तरुण मंडळीत ह्या गाण्याची मोठी क्रेझ निर्माण झाली असून हे गाणे चर्चेचा विषय ठरत आहे.

Web Title: New Marathi Song Released On Mla Shahaji Patil Dialogue Kay Jhadi Kay Dongar Kay Hatil Maharashtra Political News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..