Nashik News : गिफ्ट सिटीत सोन्याच्या नाण्यासाठी नवीन टाकसाळ; प्रेस महामंडळ सोने शुद्धीकरणात उतरणार

golden coin
golden coinesakal

Nashik News : केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या सिक्युरिटी प्रेस अॅन्ड मिंट महामंडळाच्या (एसपीएससीएल) स्तरावर देशात आणखी एक नाणेनिर्मितीची टाकसाळ उभारण्याचा विषय विचाराधीन आहे. विशेष म्हणजे, प्रस्तावित टाकसाळीत पारंपरिक चलनातील नाणे नाही, तर विशेष औचित्याने फक्त सोन्याचे नाणेच काढण्याचे नियोजन आहे.

प्रेस टाकसाळ महामंडळ हे मिनीरत्न श्रेणीतील केंद्रीय वित्तमंत्रालयाचे स्वायत्त महामंडळ आहे. सध्या देशातील नाशिक रोड, देवास, कोलकत्ता, हैदराबाद, मुंबई येथे महामंडळाचे नोट छपाईचे मुद्रणालय आणि टाकसाळ आणि कागद कारखाना आहेत. (New mint for gold coins in Gift City nashik news)

त्यात, नोटा, नाणे, नॉन ज्युडिशियल स्टॅम्प, पारपत्र, टपालाचे साहित्यांसह लष्कर, एक्साईजसह विविध अद्ययावत सुरक्षाविषयक साहित्यांची छपाई होते.

सोन्याचे रिफायनरी

आता केंद्र शासनाचे महामंडळ सोन्या-चांदीच्या रिफायनरीच्या क्षेत्रात उतरणार आहे. गुजरात येथील गिफ्ट सिटीतील प्रस्तावित प्रकल्पात प्रेस आणि टाकसाळ महामंडळातर्फे गोल्ड मेल्टिंग, रिफायनिंग अॅन्ड मीटिंग सुविधा असतील. २६ सप्टेंबरपासून या प्रकल्पाच्या निविदाप्रक्रियेला सुरवात झाली आहे.

प्रस्तावित महामंडळात सोने आणि चांदीचे नाणे तयार होणार आहेत. शिवाय सोने आणि चांदीच्या रिफायनरीचा प्रकल्प साकारणार आहे. गुजरात राज्यातील गिफ्ट सिटी केंद्रबिंदू मानून यावर काम सुरू झाले आहे. हा विषय आकाराला आल्यास यापुढे गुजरातच्या गिफ्ट सिटीत सोन्याचे नाणे तयार होणार आहेत.

golden coin
Nashik Bazar Samiti : बाजार समितीचे सचिव अरुण काळे अखेर निलंबित; सभापती पिंगळे यांचे आदेश

गिफ्ट सिटी प्राधान्य

गुजरात राज्यातील गांधीनगरनजीक ८८६ एकरांत साकारणाऱ्या विशेष आर्थिक झोन डोमेस्टिक टेरिफ एरिया म्हणून साकारणाऱ्या गिफ्ट सिटी हा केंद्र शासनाचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. वित्त-तंत्रज्ञान क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील शहराचे स्वरूप देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असताना गिफ्ट सिटीत एसपीएमसीएलतर्फे केंद्रीय मध्यवर्ती वित्तीय जिल्हा म्हणून नावारूपाला येणाऱ्या गिफ्ट सिटीत सोन्याचे मेल्टिंग, रिफायनिंग आणि मीटिंग अशा एकाचवेळी सोने वितळविणे, त्याचे शुद्धीकरणाचे जागतिक मापदंड निश्चित केले जाणार आहे. त्यातून आंतरराष्ट्रीयस्तरावर प्रेस महामंडळ हे सोन्याच्या रिफायनरीमधील एक महत्त्वाचा सार्वजनिक उद्योग म्हणून नावारूपाला येण्यासाठी जागतिक नवा भिडू म्हणून तयारीत करीत आहे.

कामकाजाचे स्वरूप वार्षिक उद्दिष्ट

सोन्याचे शुद्धीकरण १०० टन

सोन्याचे नाणेनिर्मिती २० टन

प्रकल्प क्षमता ५०० टन

golden coin
Nashik News : इलेक्‍ट्रिक टेस्टिंग लॅब उभारणीत अडथळ्यांची शर्यत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com