
नाशिक : नाशिक पोलीस आयुक्तालयाचे नवीन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे उद्या (ता.२४) सकाळी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
चार दिवसांपूर्वीच गृहविभागाने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली केल्याने त्याच्या जागी संदीप कर्णिक यांची नियुक्तीचे आदेश जारी केले होते. (new Nashik Police Commissioner Sandeep Karnik will take charge tomorrow)
पुणे पोलीस आयुक्तालयाचे सहआयुक्त संदीप कर्णिक हे नाशिकचे पोलीस आयुक्तपदी नव्याने पदभार स्वीकारणार आहेत. कर्णिक हे उद्या (ता.२४) सकाळी पुण्याहून नाशिकच्या दिशेने मार्गस्थ होतील.
सकाळी ते त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये पोहोचतील. त्यानंतर ते गंगापूर रोडवरील पोलीस आयुक्तालयात येणार आहेत. दुपारी बारा वाजेच्या सुमारास कर्णिक हे मावळते आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडून आयुक्तपदाचा पदभार स्वीकारतील.
त्यानंतर मावळते आयुक्त अंकुश शिंदे यांना निरोप दिला जाईल. यानंतर नवीन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त व पोलीस ठाण्यांचे प्रभारी पोलीस अधिकार्यांची बैठक घेऊन आढावा घेण्याची शक्यता आहे.
चार दिवसांपूर्वी गृहविभागाने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची राज्य गुप्तवार्ता विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक पदी बदली करण्यात आली तर, पुणे आयुक्तालयाचे सहआयुक्त संदीप कर्णिक यांची नाशिकचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून आदेश जारी केले आहेत.
शिंदे यांनी गेल्या डिसेंबर २०२२ मध्ये नाशिक आयुक्तपदाची जबाबदारी घेतली होती. त्यांनी गेल्या अकरा महिन्याच्या कार्यकाळात शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली होती.
तर, नव्याने येणारे आयुक्त कर्णिक यांच्यासमोर गुन्हेगारीसह आर्थिक गुन्हे आणि राजकीय दबावाचे आव्हान असणार आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.