Nashik News: शहर -ग्रामीण पोलिस दलात नवीन अधिकारी! आयुक्तालयात तांबे, डॉ. कोल्हे, देशमुख, जाधव, बारी

Nashik Police Commissionerate
Nashik Police Commissionerateesakal

Nashik News : बहुप्रतिक्षित असलेल्या पोलिस दलातील बदल्यांमुळे नाशिक शहर आयुक्तालयात चार सहायक आयुक्त तर, नाशिक ग्रामीणलाही नव्याने चार उपविभागीय अधिकारी मिळाले आहेत.

शहर -ग्रामीणमधील १२ पोलिस निरीक्षकांच्या सहायक आयुक्तपदी पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमुळे रिक्त जागांवर वर्णी लागावी यासाठी पोलिस अधिकाऱ्यांकडून लॉबिंग सुरू झाली आहे. (New officers in city rural police force In CommissionerateTambe Dr Kolhe Deshmukh Jadhav Bari Nashik News)

नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातून विशेष शाखेतील सहायक आयुक्त दीपाली खन्ना यांची मीरा-भाईंदर-वसई-विरार येथे बदली झाली आहे. तर, नाशिक सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांची पदोन्नतीने शहर आयुक्तालयात सहायक आयुक्तपदी बदली झाली आहे.

या शिवाय, नाशिक ग्रामीणमधील निफाडचे उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे, चंद्रपूरमधून शेखर देशमुख, बृहन्मुंबईतून नितीन जाधव, रत्नागिरीतून सचिन बारी यांची नाशिक शहर आयुक्तालयातील सहायक आयुक्तपदी बदली झाली आहे.

त्याचप्रमाणे, नाशिक ग्रामीणमधून उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले यांची सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर उपविभागीय अधिकारी, मालेगाव छावणीचे उपविभागीय अधिकारी प्रदीप जाधव यांची महाड उपविभागीय अधिकारी पदी बदली झाली आहे.

तर, रणजित पाटील (कराड, जि.सातारा - मालेगाव छावणी, नाशिक ग्रामीण), विक्रम कदम (पंढरपूर उपविभाग - कळवण उपविभागीय अधिकारी, नाशिक ग्रामीण), सोहेल शेख (नाशिक शहर - मनमाड उपविभागीय अधिकारी, नाशिक ग्रामीण), नीलेश पालवे (नागपूर शहर - निफाड उपविभागीय अधिकारी, नाशिक ग्रामीण) यांची नाशिक ग्रामीणमध्ये बदली करण्यात आली आहे.

या शिवाय, महाराष्ट्र पोलिस अकादमीतील नरसिंग यादव यांची बृहन्मुंबई सहायक आयुक्त, प्रदीप मैराळे (साक्री उपविभागीय अधिकारी, धुळे) यांची उपअधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, नाशिक, समीरसिंग साळवे (मनमाड उपविभाग) यांची उपविभागीय अधिकारी, इचलकरंजी, कोल्हापूर, संजय सांगळे (नंदूरबार) यांची एमपीए नाशिक येथे बदली झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik Police Commissionerate
Marriage Registration: पूर्व विभागीय कार्यालयात 5 महिन्यांत 153 विवाह नोंदणी; महापालिकाची तिजोरीत होतेय वाढ!

यांची सहायक आयुक्तपदी पदोन्नतीने पदस्थापना (कंसात पदस्थापनेचे ठिकाण)

आनंदा वाघ (नाशिक) उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर (अहमदनगर), नितीनकुमार गोकावे (पोलिस उपअधीक्षक, नाशिक ग्रामीण), वसंत लक्ष्मण भोये (पोलिस उपअधीक्षक, जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक),

दत्तात्रय पवार (उपविभागीय अधिकारी, शहादा, जि. नंदूरबार), साजन सोनवणे (उपविभागीय अधिकारी, अक्कलकुवा, नंदुरबार), बापू रोहोम (नाशिक ग्रामीण - उपविभागीय अधिकारी, काटोल, नागपूर ग्रामीण), हेमंत सोमवंशी (अपर पोलिस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, नाशिक), किरण साळवी (उपअधीक्षक, एमपीए, नाशिक),

नीलेश माईणकर (उपअधीक्षक, रत्नागिरी), प्रभाकर घाडगे (उपअधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे), बाबासाहेब ठोंबे (उपअधीक्षक, गुप्तचर प्रशिक्षण संस्था, नाशिक), डॉ. सीताराम कोल्हे (सहायक आयुक्त, नाशिक शहर).

Nashik Police Commissionerate
Nashik Bazar Samiti: मुख्यमंत्र्यांचे आदेश अन् जिल्हा उपनिबंधकाच्या नोटिशीला अखेर स्थगिती!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com