Nashik New Year Celebration
sakal
नाशिक: सरत्या वर्षाला निरोप देत उत्साह, आनंद आणि जल्लोषाच्या वातावरणात नाशिककरांनी बुधवारी (ता. ३१) मध्यरात्री बाराच्या ठोक्याला नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. शहरातील विविध नामांकित हॉटेल्स, रिसॉर्ट्स, फार्महाऊस, तसेच घरगुती पातळीवर आयोजित स्वागत सोहळ्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संपूर्ण शहरात आनंदाचे, जल्लोषाचे वातावरण पसरले होते.