New Year celebration
sakal
नाशिक: नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज झालेले असताना, यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक शहर व ग्रामीण पोलिस यंत्रणाही सज्ज झाली आहे. विनापरवाना मद्यपान न करता, तसेच कायद्याचे पालन करून नववर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन नाशिक ग्रामीणचे अधीक्षक बाळासाहेब पाटील, नाशिक शहर गुन्हेशाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी केले आहे.