Nashik Police
sakal
नाशिक: नववर्षाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यासह शहर आयुक्तालय हद्दीत पोलिस ठाणेनिहाय चोख पोलिस बंदोबस्त तैनात करीत नाकाबंदी लावण्यात आली होती. शहर वाहतूक शाखेतर्फे तळीरामांसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई केली. पोलिसांच्या सज्जतेमुळे रस्त्यावर मोकाटपणे टवाळक्या करणाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले.