Nashik News : खबरदार! नायलॉन मांजा विकाल तर...; नवनियुक्त पोलिस आयुक्तांचा विक्रेत्यांना इशारा

Nashik Police Commissioner ankush shinde latest news
Nashik Police Commissioner ankush shinde latest newsesakal

नाशिक : नाशिक पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये नायलॉन मांजा विक्री व वापरावर बंदी आहे. तरीही नायलॉन मांजाची सर्रास विक्री होत असून, यामुळे काही दिवसांपूर्वी एक दुचाकीस्वार जखमी झाला होता. या पार्श्‍वभूमीवर नवनियुक्त पोलिस आयुक्तांनी नायलॉन मांजाची गंभीर दखल घेतली असून, शहरभर शोधमोहीम राबवून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, गेल्या वर्षी तत्कालीन आयुक्तांनी मांजा विक्री करणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई केली होती. (Newly appointed police commissioner warning to manja dealers Nashik News)

नाशिक शहर व जिल्ह्यात संक्रांतीच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या प्रमाणात पतंग उडविण्याची परंपरा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पतंग उडविण्यासाठी काचेची कोटिंग असलेला नायलॉन मांजा वापरला जातो. या नायलॉन मांजामुळे गंभीर अपघाती घटना घडलेल्या आहेत. तसेच, या मांजामुळे पक्षी जखमी होण्याचे वा त्यांचा मृत्यू होण्याच्याही घटना या काळात घडतात. तर, काही दिवसांपूर्वी सातपूर परिसरामध्ये नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली.

येत्या काही दिवसात शहरात पतंग उडविण्याचे प्रमाण वाढेल, तसतसे नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार जखमी होण्याच्या घटनाही वाढण्याची शक्यता आहे. यातून गंभीर स्वरूपाची दुर्घटना घडण्याचीही शक्यता आहे. याची गंभीर दखल नवनियुक्त पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घेतली आहे. शहरात नायलॉन मांजाचा वापर व विक्रीला अटकाव करण्यासाठी शहर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जाणार आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

Nashik Police Commissioner ankush shinde latest news
Dhule News : धुळे पोलिसांवर गुरे हाकण्याची वेळ; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही ‘खो’

त्याचप्रमाणे, त्यांनी शहर हद्दीतील पोलिस ठाणेनिहाय नायलॉन मांजाबाबत करण्यात आलेल्या कारवाईची व संशयितांची माहिती संकलित करण्यात येऊन छापासत्र राबविले जाणार आहे. तसेच, प्रतिबंधित नायलॉन मांजाचा वापर व विक्री करणाऱ्यांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील असे संकेतही आयुक्त शिंदे यांनी दिले.

गतवर्षी केली तडीपारीची कारवाई

गतवर्षी तत्कालीन पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी शहरातील मांजा विक्रेत्यांविरुद्ध तडीपारीची कठोर कारवाई केली होती. मांजा विक्रीला बंदी असतानाही पोलिसांनी कारवाई करीत अनेक व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले होते. त्या वेळी आयुक्त पांडे यांच्या आदेशान्वये चार ते पाच जणांना काही दिवसांसाठी शहर- जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. पोलिसांच्या या कारवाईने व्यावसायिकांचे धाबे दणाणले होते. यंदाही अशाप्रकारे कठोर कारवाईचे संकेत नवनियुक्त पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले आहेत.

Nashik Police Commissioner ankush shinde latest news
Police Transfer : विशेष पोलीस महानिरीक्षक शेखर यांची बदली रद्द!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com