Nashik News : नाशिकसह 4 तालुक्यांसाठी अडीच कोटींचा निधी; भाजप नेते दिनकर पाटील यांचे यश

Dinkar Patil
Dinkar Patilesakal

Nashik News : एकीकडे नाशिक महापालिकेत शिवसेना (शिंदे गट) व भाजपमध्ये विकास निधीवरून रस्सीखेच सुरू असताना दुसरीकडे भाजपचे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी थेट नाशिक लोकसभा मतदारसंघातील तीस गावांसाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या निधीतून तब्बल अडीच कोटी रुपयांचा विकासनिधी प्राप्त करत विविध कामांना मंजुरी मिळविली आहे.

यातून या गावांचा कायापालट होणार असल्याची माहिती दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. (News two half crore fund for 4 talukas including Nashik Success of BJP leader Dinkar Patil Nashik news)

नाशिक लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या चार तालुक्यांचा समावेश होतो. भाजप नेते, माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी दीड वर्षांपासून या चारही तालुक्यात संपर्क वाढवत विकासकामांना प्राधान्य दिले आहे.

त्यापार्श्वभूमीवर चार तालुक्यातील ४७३ ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेवक यांच्यासोबत पत्रव्यवहार करून तसेच प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक असलेल्या मूलभूत सोयीसुविधांच्या कामाचे प्रस्ताव मागवले होते.

यात अनेक गावांमध्ये पथदीप, भुयारी गटार, रस्ते, शौचालय, स्मशानभूमी, सभामंडप नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने दिनकर पाटील यांनी या गावातील समस्यांचा पाढा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे वाचत निधीची मागणी करत पाठपुरावा सुरु केला होता.

या तीस गावातील समस्यांचा विचार व पाटील यांची तळमळ बघता ग्रामविकास मंत्री महाजन यांनी २५/१५ विकास निधीतून तब्बल अडीच कोटी रुपयांचा निधी या गावांना मंजूर केला आहे. सद्यःस्थितीत अनेक गावांमध्ये विकास कामे सुरू असून गावकऱ्यांनी दिनकर पाटील यांचे आभार मानले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dinkar Patil
Maharashtra Politics: राष्ट्रवादीला अखेर खिंडार पडलं! भगीरथ भालकेंचा पक्षाला रामराम म्हणाले, 'राष्ट्रवादीने पोरकेपणात...'

विकासनिधीबाबत गावांनी संपर्क साधावा

नाशिक लोकसभा मतदारसंघात नागरिकांशी संवाद साधताना इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वरसह नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायतीनी दिनकर पाटील यांच्याकडे विविध समस्यांबाबत रजिस्टर पोस्टाने पत्रव्यवहार केले होते.

या विकास निधीबाबत श्री. पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली असली तरी यामुळे शिंदे गटातील खासदार हेमंत गोडसे यांना शह देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगू लागली आहे

लोकसभा निवडणुकीसाठी स्वतः श्री. पाटील भाजपकडून इच्छुक आहेत. अनेक गावामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांची माहिती देण्यासाठी संवादयात्रा काढली आहे. यावेळी नागरिकांनी विविध अडीअडचणी व समस्या पाटील यांच्याकडे मांडत आहेत.

त्या सोडविण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे या चारही तालुक्यात त्यांचा संपर्क वाढत असून जनतेतून त्यांना प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांच्या समर्थकांनी म्हटले आहे. ज्या गावांना विकास निधीबाबत अडचणी असतील त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहनही श्री. पाटील यांनी केले आहे.

Dinkar Patil
Politics: रविकांत तुपकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता! जामीन रद्द करण्यासाठी पोलिस न्यायालयात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com