फोटो -NSK26H32721
पाथर्डी फाटा : वृत्तपत्र विक्रेता सन्मान सोहळ्यास उपस्थित राज्य संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र कुलकर्णी, पदाधिकारी महेश कुलथे, चंद्रकांत पवार, सुनील मगर, ‘सकाळ’चे वरिष्ठ वितरण व्यवस्थापक बळिराम पवार, ज्येष्ठ पत्रकार दीप्ती राऊत, अभिजित कुलकर्णी, डॉ. राहुल रनाळकर, जयप्रकाश पवार, संपत थेटे, सचिन अहिरराव आदी.
फोटो -NSK26H32722
पाथर्डी फाटा : गुणवंत पाल्यांसह वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी.
सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वर्धापनदिनी विविध उपक्रम
---------------------------------------------------
जीवन गौरव, महिला विक्रेत्यांचा सन्मान, गुणवंत पाल्यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
नवीन नाशिक, ता.१६ : सिडको वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संघटना, नवीन नाशिकचा वर्धापन दिन पाथर्डी फाट्यावरील गजानन महाराज नगरातील रेणुकाबाई आनंदराव शेलार सभागृहात सामाजिक बांधिलकी जपत व विविध उपक्रम राबवीत उत्साहवर्धक वातावरणात साजरा करण्यात आला.
ज्येष्ठ पत्रकार दीप्ती राऊत, अभिजित कुलकर्णी, डॉ. राहुल रनाळकर, जयप्रकाश पवार, संपत थेटे, सचिन अहिरराव, सकाळचे वरिष्ठ वितरण व्यवस्थापक बळिराम पवार, प्रमोद मुसळे, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र कुलकर्णी, सचिव महेश कुलथे, नाशिक शहर अध्यक्ष चंद्रकांत पवार, नाशिकरोड अध्यक्ष सुनील मगर, कैलास बडगुजर आदींच्या उपस्थितीत वर्धापनदिन सोहळा पार पडला. या वेळी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या गुणवंत पाल्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले, तर वृत्तपत्र व्यवसायात खांद्याला खांदा लावून मदत करणाऱ्या महिला भगिनींचा संस्थेच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला. वृत्तपत्र क्षेत्रात प्रदीर्घ योगदान दिल्याबद्दल जयप्रकाश पवार, बापूराव चौधरी, विजय सोनार, नरेंद्र दंडगव्हाळ, विनोद कोर व किरण कर्जोदकर यांना जीवन गौरव २०२६ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
महिला सन्मान व पैठणी लकी ड्रॉ
मनीषा बोरसे, मनीषा नेर, विजया वाळेकर, सुवर्णा ठाकरे, राजश्री कापुरे, ज्योती जगताप, वर्षा पात्रीकर, गायत्री कोपळ, पुष्पा भांड, कु. गायत्री कुंभार्डे व कु. मानसी पवार यांचा महिला विक्रेता-स्टॉलधारक म्हणून सन्मान झाला. पैठणी लकी ड्रॉ मध्ये रेखा शेलार, सुनीता कर्जोदकर, आरती मढवई, मनीषा नेर, वर्षा पात्रीकर, साधना पाटील व उज्वला भांड या विजेत्या ठरल्या.
विशेष नैपुण्य व पाल्य गौरव
श्रावणी महेश नांदुर्डीकर (दहावीत १०० %टक्के गुण), निकिता संजय शेलार (महाविद्यालयीन नाट्य स्पर्धा - विशेष लेखन व अभिनय पुरस्कार) व साई नरेंद्र दंडगव्हाळ (बी.ई. कॉम्प्युटर - विशेष प्रावीण्य यांना विशेष नैपुण्य पुरस्कार देण्यात आला. अनन्या शिरोडे, लाभेश वाळेकर, सोहम सहजराव, युवराज मढवई, देवांश गोसावी यांच्यासह एकूण ३५ पाल्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. या प्रसंगी सुशील आय केअर युनिट ऑफ डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलच्या वतीने सर्व सदस्य व परिवाराची मोफत नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली.
या वेळी ‘सकाळ’च्या वतीने बळिराम पवार यांनी संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय ठाकरे यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन सोनाली घोटेकर व सविता जोंधळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष दत्तात्रय ठाकरे, उपाध्यक्ष बाळू सूर्यवंशी, सचिव चंद्रकांत बोरसे, सहसचिव किरण कर्जोदकर, खजिनदार संजय शेलार, प्रसिद्धी प्रमुख अतुल शिरोडे, संदीप मढवई व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.