कल्याणकारी मंडळ तातडीने स्थापन करावे

कल्याणकारी मंडळ तातडीने स्थापन करावे
Published on: 
बातमी आवश्‍यक NSK26H31837 जळगाव : वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ तातडीने स्थापन करावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देताना वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी. ------ कल्याणकारी महामंडळ तातडीने स्थापन करावे उपशीर्षक वृत्तपत्र विक्रेत्यांची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ९ : महाराष्ट्रातील लाखो वृत्तपत्र विक्रेते व वितरकांच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी तसेच स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळ तातडीने कार्यान्वित करण्याच्या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी (ता.९) राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. त्याअंतर्गत महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जळगाव जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शुक्रवारी (ता.९) दुपारी गोलाणी मार्केट चौकातून मोर्चा काढण्यात आला. शिवाजी पुतळा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. या वेळी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. यांचा होता सहभाग जळगाव शहर वृत्तपत्र विक्रेता विकास फाउंडेशन अध्यक्ष प्रा.नितीन चौधरी, उपाध्यक्ष विशाल वाणी व संजय चौधरी, सचिव विजय कोतकर, उपसचिव अर्जुन पाटील, ज्येष्ठ सल्लागार रवी जोशी, विलास वाणी, गोपाळ चौधरी, वसंत गायकवाड, भालचंद्र वाणी, हेमंत खडके, अनिल पाटील, तुषार चौधरी, महेश सोनार, हरीश चौधरी, संतोष शेळके, मिलिंद भावसार, हिरालाल टेकावडे, राकेश सोनार, रवींद्र येवले, किशोर साळुंखे, शिवाजी शिंदे, प्रदीप वाणी, दिनेश वाणी, सुनील बाविस्कर, चंद्रकांत जगताप, सुनील पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले. ---- चौकट कल्याणकारी मंडळासाठी निवेदन वृत्तपत्र विक्रेते ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता जनतेपर्यत ज्ञान आणि माहिती पोहोचवत असतात, कोरोना काळातही विक्रेत्यांनी जिवावर उदार होऊन आपली सेवा सुरुच ठेवली, तरीही त्यांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले. त्यासाठीच आजचे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या वतीने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देण्यात आले. त्यात ऑक्टोबर २०२४ मध्ये कल्याणकारी मंडळाची घोषणा झाली, पण आजपर्यत अंमलबजावणी नाही. त्यामुळे तत्काळ कल्याणकारी मंडळ स्थापन करुन वृत्तपत्र विक्रेत्यांना त्यासंबंधी सवलती उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. ---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com