मालेगाव वृत्तपत्र विक्रेता संघटनातर्फे मोर्चा

मालेगाव वृत्तपत्र विक्रेता संघटनातर्फे मोर्चा
Published on: 
सर मालेगाव, सटाणा येथील दोन्ही बातम्या एकत्रित केल्या आहेत. पान ४ ------------ फोटाे- 16068 मालेगाव : अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी निवेदनप्रसंगी घोषणा देताना वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी. --फोटो- 06907 सटाणा ः नायब तहसीलदार सचिन मारके यांना निवेदन देताना वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे पदाधिकारी. ------ ५०-४ कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी करा ------------ वृत्तपत्र विक्रेत्यांची शासनाकडे मागणी ः मालेगाव, सटाणा येथे मोर्चा, निवेदनातून साकडे ---------------- सकाळ वृत्तसेवा मालेगाव- सटाणा, ता. ९ : संपूर्ण राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी घोषित केलेल्या कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी कधी होणार असा प्रश्न सरकारला करत मालेगाव, सटाणा येथील वृत्तपत्र विक्रेत्यांनी शुक्रवारी (ता.९) मोर्चा काढत निवेदन दिले. मालेगाव वृत्तपत्र विक्रेता संघटनातर्फे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर संघटनेचे अध्यक्ष पापान्ना यादव, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढत मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सटाणा येथे संघटनेचे अध्यक्ष सुनील सातव, सचिव सागर जाधव आदींच्या उपस्थितीत नायब तहसीलदार सचिन मारके यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. -------------------- मालेगाव येथे मालेगाव वृत्तपत्र विक्रेता संघटनातर्फे मोसम चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरवात झाली. वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी फलक घेत ‘राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा विजय असो’, ‘कल्याणकारी मंडळ आमचं हक्काच’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘ज्ञानदूत वाचवा, छपाई माध्यम वाचवा’ यांसह विविध घोषणा देण्यात येत होत्या. रवींद्र कुलकर्णी म्हणाले, १० ऑक्टोबर २०२४ ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र २४ महिने उलटूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. वृत्तपत्र विक्रेत्यांमुळे लोकशाहीचा चाैथा स्तंभ टिकून आहे. मात्र या घटकाला आजही कोणत्याही सुविधा दिल्या जात नाही. ऊन, वारा, पाऊस याची तमा बाळगता नागरिकांपर्यत सत्य पोहोचविण्याचे काम वृत्तपत्र विक्रेता करतो. शासनाने लवकरच कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी करावी; अन्यथा येत्या काळात मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. नायब तहसीलदार देंवेंद्र कुरे, संजय गांधी विभागाचे नायब तहसीलदार संजय खैरे यांना निवेदन देण्यात आले. श्री. कुलकर्णी, पापान्ना यादव, ज्येष्ठ विक्रेते विश्‍वनाथ धामणे, नंदू गवळी, राजेंद्र गवळी, दीपक यादव, नामदेव गवळी, प्रशांत कासार, प्रदीप कासार, प्रशांत गुरू कासार, दगडू बोरकर, शरद चौधरी, भिला ब्राह्मणकर, खंडू अहिरे, संजय अहिरे, संजय जगताप, संजय सूर्यवंशी, संतोष एंडाईत, रमेश पाटील, अनिल जाधव, बापू पाटील, देवेंद्र नागमोती, नरेंद्र जाधव, दत्ता गवळी, आबा सोनजे, पुष्पा यादव, रेखा कुलकर्णी, नीता गवळी, कोमल बधान यांच्यासह अनेक वृत्तपत्र विक्रेते उपस्थित हाेते. -------------------- २०-२ सटाणा येथे नायब तहसीलदारांना निवेदन सटाणा : वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय रखडल्याने बागलाण तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. महामंडळ तातडीने कार्यान्वित करून वृत्तपत्र विक्रेत्यांना सामाजिक सुरक्षा, विमा, निवृत्तिवेतनासह विविध कल्याणकारी योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. नायब तहसीलदार सचिन मारके यांना देण्यात आले. वृत्तपत्र विक्रेते असंघटित कामगारांच्या श्रेणीत असल्याने त्यांना सामाजिक सुरक्षा आणि विविध कल्याणकारी सुविधांचा लाभ मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे तातडीने शासन निर्णय काढून महामंडळ कार्यान्वित करावे आणि विक्रेत्यांना विमा, निवृत्तिवेतन व अन्य सुविधांचे संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष सुनील सातव, सचिव सागर जाधव, वृत्तपत्र विक्रेते बापू बागूल, संजय शिंदे, संजय अहिरे, सुरेश सातव, नरेंद्र निकम, चेतन बागूल, स्वप्निल शिरोडे, घनश्याम शेवाळे, विनायक भावसार यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार अंबादास देवरे आणि परिमल चंद्रात्रे उपस्थित होते. ------------ २०-२ वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रमुख मागण्या - वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळ तातडीने कार्यान्वित करावे. - महामंडळाबाबत तातडीने शासन निर्णय (जीआर) काढावा. - वृत्तपत्र विक्रेत्यांना सामाजिक सुरक्षा आणि विमा संरक्षण द्यावे. - विक्रेत्यांसाठी निवृत्तिवेतनाची सुविधा उपलब्ध करावी. - कल्याणकारी योजनांच्या लाभासाठी अंमलबजावणी करावी. ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com