नाशिक: औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयानुसार त्वरित समायोजन करणे, १० व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन करून समान काम, समान वेतन लागू करावे यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीतर्फे गुरुवारी (ता. २८) जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर आंदोलन करण्यात आले. एकत्रीकरण समितीतर्फे १९ तारखेपासून राज्यभर कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.