NIE Workshop
sakal
नवीन नाशिक: ‘सकाळ एनआयई’तर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी ध्यान, योगाविषयक मार्गदर्शन व कार्यशाळा बुधवारी (ता. १८) सकाळी सिडको येथील शिवशक्ती चौक परिसरातील नवजीवन डे विद्यालयात झाली. या वेळी ध्यान तसेच अभ्यासासाठी योगाचे महत्त्व यावर चर्चासत्र झाले. केटीएम महाविद्यालयातील योगशिक्षिका डॉ. मीनाक्षी गवळी-आहेर यांनी प्रात्यक्षिके घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.