फोटो- 10279
दारणा सांगवी (ता. निफाड)-ः विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करताना आरोग्य निरीक्षक प्रीतेश राऊत, अक्षय पाटील आदी.
सव्वा लाख मुलांना
जंतनाशक गोळ्या
निफाड तालुक्यात आरोग्य विभागातर्फे मोहीम
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगांव बसवंत, ता. ३१ ः १ ते १९ वयोगटातील मुलांचे कुपोषण टाळण्यासाठी आरोग्य विभागातर्फे निफाड तालुक्यात जंतनाशक मोहीम राबविण्यात आली. सव्वा लाख विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. गटविकास अधिकारी नम्रता जगताप, तालुका आरोग्याधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत, चांदोरी, ओझर, म्हाळसाकोरे, नैताळे, निमगाव वाकडा, देवगाव, खडकमाळेगाव, पालखेड, कसबे सुकेणे येथे ही मोहीम राबविण्यात आली.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कोशिरे यांनी विविध शाळानां भेट देऊन मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. तसेच जंतामुळे होणारे शारीरीक दुष्पपरिणाम समजावुन सांगितले. आरोग्यसेवक, सेविका, अंगणवाडी कार्यकर्ती, आशासेविका यांनी मोहीम यशस्वी केली. .
राज्यस्तरीय पथकाने चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चितेगांव येथे भेट दिली. पथकात डॉ. स्वप्नील गायकवाड, डॉ. हर्षल नेहते, बाळासाहेब पदक यांचा समावेश होता. डॉ. इरेश पाटील, तालुका पर्यवेक्षक आरिफ मन्सुरी, आरोग्य निरीक्षक प्रीतेश राऊत, दीपक आहिरे, आरोग्य सेवक हेमंत भोईटे, हेमंत पाटील आदी उपस्थित होते.
---------